esakal | महापालिका घेणार एक कोटींचे व्हेंटिलेटर...आयुक्तांची ग्वाही : नगरसेवक अभिजित भोसले यांची माहिती 
sakal

बोलून बातमी शोधा

ventilator.jpg

सांगली-  महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे बळी जाण्याचे प्रकार घडत आहेत. हे लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने व्हेंटिलेटर खरेदी करण्याची मागणी नगरसेवक अभिजित भोसले यांनी केली. यावर महापालिकेच्या वतीने एक कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर खरेदी करण्याची ग्वाही आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे, अशी माहिती नगरसेवक भोसले यांनी दिली. 

महापालिका घेणार एक कोटींचे व्हेंटिलेटर...आयुक्तांची ग्वाही : नगरसेवक अभिजित भोसले यांची माहिती 

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली-  महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे बळी जाण्याचे प्रकार घडत आहेत. हे लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने व्हेंटिलेटर खरेदी करण्याची मागणी नगरसेवक अभिजित भोसले यांनी केली. यावर महापालिकेच्या वतीने एक कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर खरेदी करण्याची ग्वाही आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली आहे, अशी माहिती नगरसेवक भोसले यांनी दिली. 

महापालिका क्षेत्रात कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने रुग्णांना बेड मिळत नाहीत, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. याशिवाय डिपॉझिट घेतल्याशिवाय रुग्णाला दाखल करून घेतले जात नाही, अशा नागरीक तक्रारी करत आहेत. रुग्णांची आवश्‍यक ती व्यवस्था होत नसल्याने, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 
आज सकाळी एका रुग्णाला कोविड रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईक फिरत होते. मात्र एकाही रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेतले नाही. मनपाच्या कोविड सेंटरमध्येही दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. अखेर नातेवाईकांनी नगरसेवक अभिजित भोसले यांना फोन केला. 

भोसले यांनी आदित्य हॉस्पिटलमध्ये रुग्णाला घेऊन जाण्याच्या सूचना नातेवाईकांना दिल्या. मात्र 25 हजार रुपये डिपॉझिट भरल्याशिवाय रुगणाला दाखल करून घेण्यास रुग्णालय व्यवस्थापनाने नकार दिला. त्यामुळे डिपॉझिटच्या पैशाची जुळवाजुळव करण्यात तासभर गेला. या काळात रुग्णाची तब्येत बिघडली. अखेर त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी ही माहिती नगरसेवक भोसले यांना दिल्यावर ते तातडीने रुग्णालयात दाखल झाले. व्यवस्थापनाला त्यांनी याचा जाब विचारला आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिसांना तशी माहिती देण्यात आली. प्रकरण वाढत चालल्याचे दिसताच पोलिसांनी जिल्हा व मनपा प्रशासनाला याबाबत माहिती दिली. 

व्हेंटिलेटरसाठी स्थायीची सभा 
आयुक्त नितीन कापडणीस यांनी नगरसेवक भोसले यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. भोसले यांनी सर्व वस्तुस्थिती स्पष्ट करत रुग्णांसाठी व्हेंटिलेटर तातडीने खरेदी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. तसेच संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी केली. नगरसेवक भोसले म्हणाले, महापालिका तातडीने एक कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर खरेदी करेल. त्यासाठी विशेष स्थायी समितीची सभा घेण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली आहे. तसेच "डिपॉझिट' भरल्याशिवाय कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारास टाळाटाळ करणाऱ्या 'आदित्य' हॉस्पिटलच्या कारभाराची चौकशी करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असेही भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले. 
 

loading image
go to top