अविश्‍वास ठरावावर चर्चेला शेटफळेच्या सरपंच गैरहजर

अविश्‍वास ठरावावर चर्चेला शेटफळेच्या सरपंच गैरहजर

आटपाडी - शेटफळे (ता.आटपाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा प्रदीप शिरसागर यांच्या विरोधातील विश्वास ठरावाला सामोरे न जाता अनुपस्थित राहिल्या. विरोधी बाराही सदस्यांनी उपस्थित राहून अविश्वास ठरावाच्या बाजूने मत नोंदवले.   

शेटफळे (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या पासष्ठ वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच सरपंचांच्या विरोधात सर्व सत्ताधारी-विरोधक आणि अपक्ष ग्रामपंचायत सर्वच बाराही सदस्यांनी एकत्र येऊन अविश्वास ठराव दाखल केला होता. गेल्या आठवड्यात सर्व सदस्यांनी सरपंचांच्या कारभारावर आक्षेप घेऊन महसूल विभागाकडे अविश्वास ठराव मांडला होता. आज तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावाची बैठक झाली. या बैठकीकडे संपूर्ण गावचे लक्ष लागले होते. या बैठकीला सरपंच रेश्मा शिरसागर या गैरहजर राहिल्या तर ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गायकवाड, प्रकाश गायकवाड, ओंकार जवळे, मनीषा गायकवाड, मेघा गायकवाड, राजू कांबळे, बळीराम गायकवाड आदी बाराही सदस्य उपस्थित होते.

बैठकीत तहसीलदार श्री. लंगुटे यांनी सर्व सदस्यांचे मते जाणून घेतली. सर्व सदस्यांनी सरपंचाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त करून अविश्वास ठरावाच्या बाजूने मत मांडले. त्यामुळे सरपंचांच्या विरोधातील अविश्वास ठराव शून्य विरोधातीम 12 मताधिक्याने मंजूर झाला. सरपंच शिरसागर या भाजपमधून साडेतीन वर्षांपूर्वी निवडून आल्या होत्या. सुरुवातीला दोन वर्षासाठी त्यांना पदाची संधी दिली होती. त्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ दिली.

तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा न देण्याऐवजी सत्ताधारी आणि विरोधी गटातील सदस्यसाठी गळ टाकले होते मात्र त्यांच्या गळाला कुणीही लागले नाही. मुळातच त्यांच्या कारभारावर सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेनेच्या गोटात तीव्र नाराजी होती. त्यांना पदावरून दूर करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने परस्परातील वादाला मूठमाती देऊन एकत्र आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com