गणेशोत्सवात ‘नो डॉल्बी’चा ढोल

Ganeshotsav
Ganeshotsav

सांगली - गणेशोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपलाय. महापुरामुळे निम्मी सांगली पाण्याखाली गेली. मोठे नुकसान सांगलीकरांचे झाले. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘नो डॉल्बी’चा ढोल वाजवला जात आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आता पुढाकार घेतला. साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून खर्चाला फाटा देण्याचा निर्धारही मंडळांनी केला. पोलिस दलाने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

महापुरामुळे निम्मी सांगली पाण्याखाली गेली. मुख्य बाजारपेठा उद्‌ध्वस्त झाल्या. सांगलीकरांचे मोठे नुकसान झाले. सांगलीकरांच्या मदतीसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे आले. आता सांगली सावरत आहे. सांगलीकर दुःखात असले तरी आठवड्यावर आलेल्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी लोक सज्ज झाले आहे. अगदी साधेपणाने गणेशोत्सव करयाचा निर्णय काहींनी घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही डॉल्बीसह अनावश्‍यक खर्चाला फाटा देत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी पोलिस  दलानेही मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तशा सूचना दिल्या, त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. 

फेसबुक, व्हॉस्‌ॲपसारख्या सोशल मीडियावरही तरुणांनीही ‘नो डॉल्बी’चा ढोल वाजवत पूरग्रस्तांसाठी  ‘एक मदत’ असा नारा दिला आहे. एरव्ही वायफळ गप्पा मारणारे नेटीझन्स्‌ आता खऱ्या अर्थाने मदतीसाठी  पुढाकार घेत आहेत. शहरातील सर्व मंडळांनी अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com