दाजीपूर अभयारण्यात ३१ रोजी प्रवेश बंदी

राजू पाटील
सोमवार, 24 डिसेंबर 2018

राधानगरी - सरत्या वर्षाच्या अखेरीला ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवशी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. हुल्लडबाज पर्यटकांकडून ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर अभयारण्यात पार्ट्या करून अनुचित घटना घडू नये, यासाठी अभयारण्यातही प्रवेशाला बंदी राहणार आहे.

कोणीही या अभयारण्यक्षेत्रात या दोन दिवसांत प्रवेश केल्यास कारवाईचा इशारा वन्यजीव विभागाने दिला. सलग दोन्ही दिवस अभयारण्यक्षेत्रात वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्तीपथके तैनात राहणार आहेत. वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्याना त्यांच्या नियत क्षेत्रात कार्यरत राहणे सक्तीचे करण्यात आले आहे. काही महिन्यात अभयारण्यक्षेत्रात पर्यटकांचा ओघ वाढता आहे. मात्र वर्षाअखेर आणि नववर्ष प्रारंभाला पर्यटकांकडून हेणाऱ्या जेवणावळी व पार्ट्या रोखण्यासाठी वन्यजीव विभागाने ही विशष दक्षता घेतली आहे.

पावसाळ्यानंतर पर्यटकांसाठी खुले झालेले अभयारण्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आले. अनेकांनी हुल्लडबाजीचे दर्शन दिले. यावर ‘सकाळ’मधून प्रकाश टाकला होता. आता वन विभागाने शिस्त कडक करून योग्य दिशा देण्याचे काम सुरू केले आहे.

Web Title: No Entry on 31st December in Dazipur Wildlife Sanctuary