शेळ्यामेंढ्यांच्या चाराछावणीची अंमलबजावणी न झाल्याने प्रश्न गंभीर

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा : जनावरांच्या छावणीप्रमाणे शेळ्या मेंढ्याच्या छावण्या सुरू करण्याचा निर्णय झाला, पण तालुक्यात अमंलबजावणी झाली नसल्यामुळे 72 हजार शेळ्यामेंढ्याचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेळ्या मेंढ्या ला कुसळा बरोबर काटेरी वनस्पती खाण्याची वेळ आली.

सध्या तालुक्यात 57 जनावरांच्या छावणीतून 34 हजाराच्याआसपास जनावरे जगवली जात आहेत. ती शेतकरी संख्येची मर्यादा असल्यामुळे बहुतांश शेतकरी जनावरे देखील घरच्या दावणीला आहेत तर काही शेतकऱ्याकडे थांबायला कोणी नसल्यामुळे त्यांची जाणार घरी असल्यामुळे निम्म्याहून अधिक जनावरे देखील शेतकरी आहेत जनावरांचे व्यवस्थापन सध्यातरी समाधानकारक आहे. परंतु, सध्या शासनाकडून मिळणाऱ्या  ठेवणीतल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत जनावरांचा चारा बरोबर पशुपालकाची उपासणार होऊ नये म्हणून शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपत  नाष्ट्याची सुविधा उपलब्ध करून दिली. दुधाळ पशुधनना बरोबर तालुक्यामध्ये शेळ्या-मेंढ्यांच्या गुजराण करणारे अनेक कुटुंबे अस्तित्वात आहेत. त्यामध्ये विशेषतः दक्षिण भागातील धनगर समाजाच्या कुटूंबाचा यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यावर त्या कुटूंबाची गुजराण होत आहे. मात्र चाऱ्याअभावी ही उपासमार होत आहे.

शेळ्या मेंढ्यांची जिवंतपणी चाराअभावी उपासमार होण्यापेक्षा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झाल्यावर किमान शासकीय मदत तर वेळेवर तात्काळ मिळते. पण जिवंत रहावी म्हणून उपाययोजना विलंब होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मंत्र्यांच्या दुष्काळ दौय्रात हृदयाच्या छावणीतील पशुपालकानी जनावरांबरोबर शेळ्या मेंढ्याची देखील छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी केली या मागणीची दखल घेत उशिरा का होईना शेळ्या-मेंढ्या साठी चारा छावण्याची मंजूर झाल्याची घोषणा झाली पण प्रत्यक्षात छावणीची परंतु प्रत्यक्षात मात्र अजूनही अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांची छावणी म्हणजे फक्त कागदोपत्री अंमलबजावणीचा अनुभव या भागातील शेळ्या मेंढ्या धारक शेतकय्राना आला.  नसल्यामुळे गहोत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी पावसाला अद्याप तालुक्यांमध्ये सुरुवात झाली नाही पाऊस पडला देख पडल्यानंतर हिरवा चारा उगवून यांच्या तोंडाला येईपर्यंत बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्यामुळे या छावण्या देखील तातडीने सुरू होण्याची आवश्यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com