विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही - सभापती डोंगरे

राजकुमार शहा
बुधवार, 16 मे 2018

मोहोळ (सोलापूर) : तालुक्यातील कुठल्याही विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, दिलेला निधी वेळेत खर्च करून आणखी निधीची मागणी करा याच पद्धतीने गेल्या वर्षभरापासून काम सुरू आहे. राहिलेल्या कालावधीत जनतेची कामे करावीत गटविकास अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करुन दिली तर विरोधकांच्या दालनासाठी निधी देऊ असे प्रतिपादन अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी केले.

मोहोळ पंचायत समितीतील आघाडीचे गट नेते अशोक सरवदे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन सभापती डोंगरे व आरपीआयचे महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी डोंगरे बोलत होते. यावेळी सभापती समता गावडे गटविकास आधीकारी अजिंक्य येळे सुनिता भोसले विशाल पवार सौदागर खडके पांडुरंग बचुटे अशोक भोसले प्रकाश काळे आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी राजाभाऊ सरवदे म्हणाले, अशोक सरवदे यांच्या कार्यकालात पंचायत समितीच्या अनेक योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचल्या आहेत. आता त्यांनी मोहोळ विधानसभा लढवावी भिमा व लोकशक्तीची त्यांना साथ मिळेल. यावेळी फित कापुन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

Web Title: No lack of donation for development work said by sabhapati dongare