निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची वेळ येणार नाही : तालुकाअध्यक्ष काळे

mohol
mohol

मोहोळ : गेल्या पंचवीस वर्षापासून आष्टी तलावातुन पोखरापुर तलावात पाणी सोडण्याचा प्रश्न गाजतो आहे. मात्र त्याला अद्याप यश आले नाही. आष्टी उपसासिंचन योजनेअंतर्गत असणाऱ्या या योजनेला फेरमंजुरी मिळाली असून त्यासाठी 26 कोटी रुपयाची तरतुद झाली आहे. येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्या हस्ते कामाचा आरंभ करण्यात येणार असून, निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची वेळ येणार नसल्याचे प्रतिपादन भाजपाचे तालुकाअध्यक्ष सतीश काळे यांनी केले.

आष्टी तलावातुन पोखरापुर तलावात पाणी सोडावे, पोखरापुरसाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारावे या मागणीसाठी पंढरपूर मोहोळ राज्यमार्गावर पोखरापुर येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी काळे बोलत होते, त्यांनी या योजनेबदलची प्रशासनातील वस्तुस्थिती अंदोलकाना सांगितली. यावेळी अंदोलनात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, माजी उपसभापती मानाजी माने, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, माजी जिल्हाप्रमुख दिपक गायकवाड, युवा सेनेचे महेश देशमुख, सभापती समता गावडे, सोमेश क्षीरसागर, सिंधु वाघमारे, नागेश वनकळसे, यशवंत नरूटे, संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासो भोसले, प्रकाश चवरे संजीव खिलारे, धोंडीबा उन्हाळे, सेनेचे उपजिल्हा प्रमुख चरणराज चवरे आदीसह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी राजन पाटील म्हणाले, या कामासाठी केवळ खवणी, पोखरापुर व सारोळे या तीन गावांनी संघर्ष करण्याऐवजी संपुर्ण तालुक्याने संघर्ष केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लोकसभा व विधानसभा निवडणुकी अगोदर या योजनेच्या कामाला सुरवात झाली तर मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्याना पहिला हार आम्ही घालू. गेल्या माहिन्यापुर्वी तीन गावातील शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे निवेदन दिले होते. मात्र तसे न करण्याची सुचना पाटील यांनी यावेळी दिली.

आंदोलन सुरू असताना पंढरपूराहुन सोलापुरकडे जाण्यासाठी दोन रुग्णवाहिका आल्या. आंदोलकांनी त्यांना तातडीने मार्ग मोकळा करून दिला. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दिपक गायकवाड यांनी उजनी धरणातुन मोठ्या जलवाहिन्या टाकून पाणी इतर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींना पाणी पळविण्याचे काम सुरु आहे, ते अगोदर बंद पाडण्याचे अवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com