कांदा गडगडल्‍याने डोळ्यात पाणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

म्हसवड - माण तालुक्‍यात पाण्याच्या उपलब्धतेचा अंदाज घेत आणि पाणीटंचाईवर मात करून अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातही गहू, हरबरा, ज्वारी आदी पिकांना फाटा देऊन कांद्याची लागवड केली. सध्या कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, वर्षभर राबराबून बाजारात आणलेल्या कांद्याला केवळ दोन ते पाच रुपये भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे.

हवामानात उकाडा वाढल्यानंतर कांदा नासण्याची शक्‍यता अधिक असते. सध्या उकाडा वाढल्याने साठवणुकीला ठेवलेला कांदा शेतकऱ्यांनी बाहेर काढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक बाजारपेठेत होऊ लागल्याने ग्राहक कमी आणि आवक जादा अशी विरोधाभास परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या गाड्या उभ्या राहू लागल्या आहेत. परिणामी कांदा दोन-तीन रुपये किलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

कांद्याचे भाव धडकन कोसळून दोन रुपये किलोवर आल्याने शेतकऱ्यांना बारदान, हमाली व वाहतुकीचा खर्च निघणेही मुश्‍कील झाले आहे. मागील वर्षापाठोपाठ सलग यावषीर्ही कांदा पिकाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले आहेत. 

दरम्यान, भारत सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे. गेल्या वर्षभरापूर्वी भारत सरकारने कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेऊन कांद्याचे भाव नियंत्रणात आणले होते. कांद्याचे भाव स्थिर राहावेत म्हणून शेजारील पाकिस्तानातून हजारो टन कांद्याची आयात केली गेली होती. या निर्णयांमुळे देशांतर्गत कांद्याचे भाव पडले होते. आज वर्षभरानंतरही या परिस्थितीमध्ये काहीही फरक पडला नाही. 

एक हजार रुपये अनुदान द्या 
दरम्यान, आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान १२०० रुपये क्विंटल भाव द्यावा किंवा प्रति क्विंटल किमान एक हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी माण तालुक्‍यामधील शेतकऱ्यांमधून होत आहे. 

Web Title: No rate onion