कर्ज माफीपर्यंत उसाचे पैसे कपात करू नये, श्रीगोंद्यातील सोसायट्यांचा ठराव 

संजय आ. काटे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

श्रीगोंदे - शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत कर्जवसुली करू नये या फतव्याचा आधार घेत तालुक्यातील शेतकऱ्यांची जिल्हा बँकेने ऊस बिलातून कपात करू नये असा ठराव तालुक्यातील १७३ सहकारी सोसायटीच्या प्रतिनिधींनी घेतला आहे. सोमवारी येथील जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेच्या आवारात बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक झाली. 

यावेळी पानसरे म्हणाले की, तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेची कर्ज परतफेड केले आहे. या वर्षी भयानक दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडून कर्ज वसुली करणे बरोबर नाही. त्यामुळे ऊस बिलातून शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम देऊ नये आणि सोसायटीचे सचिव व बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे कपात करण्यासाठी साखर कारखान्यावर जाऊ नये. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. राज्यात भाजपाला झटका बसल्याने शेतकरी कर्जमाफीचा देशव्यापी निर्णय होऊ शकतो. त्यामुळे कर्ज वसुलीत सावध भुमिका घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची संमती घ्यावी असेही पानसरे म्हणाले. 

तुकाराम दरेकर, राजेंद्र म्हस्के, हरिदास शिर्के, संजय जामदार, सुभाष डांगे, एकनाथ बारगुजे, सुभाष काळोखे यांची भाषणे झाली. दिलीप चौधरी यांनी आभार मानले. 

Web Title: No tax deduction should be done for loan forgiveness, society's resolutions of Shrigonda