चिठ्ठी ठरवणार "उत्तर'चे सभापती 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पंचायत समिती सभापती पदाच्या सोडतीमध्ये उत्तर सोलापूर तालुक्‍याचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्‍चित झाले आहे. या पंचायत समितीमध्ये भाजप व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना या महाविकास आघाडीकडे समसमान संख्याबळ असल्याने चिठ्ठीद्वारे सभापतींची निवड केली जाण्याची शक्‍यता आहे.

सोलापूर ः जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पंचायत समिती सभापती पदाच्या सोडतीमध्ये उत्तर सोलापूर तालुक्‍याचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्‍चित झाले आहे. या पंचायत समितीमध्ये भाजप व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना या महाविकास आघाडीकडे समसमान संख्याबळ असल्याने चिठ्ठीद्वारे सभापतींची निवड केली जाण्याची शक्‍यता आहे.
जिल्ह्यात सर्वांत लहान पंचायत समिती म्हणून उत्तर सोलापूर तालुक्‍याला ओळखले जाते. पंचायत समितीचे चार सदस्य आहेत. त्यामध्ये दोन सदस्य भाजपचे, एक कॉंग्रेसचा व एक राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सदस्य सभागृहात आहे. पण, कॉंग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप माने यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सोलापूरच्या या खटल्यात उज्वल निकम विशेष सरकारी वकील

त्यामुळे कॉंग्रेसचे सदस्य हरिदास शिंदे हे आपल्या नेत्यांसमवेत शिवसेनेत गेले आहेत. 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तालुक्‍यात राष्ट्रवादी व भाजपने एकत्र येत निवडणुका लढविल्या होत्या. मात्र, त्यानंतर झालेल्या बाजार समिती, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. त्यातच आता विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेची महाविकास आघाडी राज्यात स्थापन झाली आहे. त्यामुळे साहजिकच आता पंचायत समितीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य एकत्र येणार हे जवळपास निश्‍चित आहे. महाविकास आघाडीकडे दोन व भाजपकडे दोन जागा आहेत. त्यामुळे नव्याने सभापती निवडण्यासाठी चिठ्ठीचा आधार घेण्याशिवाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पर्याय नसल्याचे या सगळ्या प्रकारावरून दिसून येते. 

नशीब कुणाला देणार साथ 
भाजपकडून विद्यमान सभापती संध्याराणी पवार पुन्हा सभापतिपदाच्या रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने शिवसेनेच्यावतीने श्री. शिंदे हे मैदानात उतरतील. दोघांकडे समसमान बलाबल असल्यामुळे चिठ्ठीद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यामध्ये नशीब कुणाला साथ देणार त्यावर सभापतिपद कुणाकडे जाणार हे निश्‍चित होणार आहे.

महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: north solapur sabhpati election