कऱ्हाड उत्तर, दक्षिणेत भाजपची मोर्चेबांधणी

हेमंत पवार
शुक्रवार, 18 मे 2018

कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीचे घोडेमैदान अजूनही दूर असले तरी भाजपने मात्र आतापासून वातावरनिर्मिती करून मोर्चेबांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. तीनच दिवसांपूर्वी भाजपच्या कऱ्हाड उत्तर आणि दक्षिणमधील उमेदवारांच्या नावावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्कामोर्तब केले. उत्तरमधून जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे आणि दक्षिणेतून विठ्ठल-रुक्‍मिणी देवस्थान संस्थानचे अध्यक्ष अतुल भोसले यांची नावे निश्‍चित झाल्याचे सांगितले जात आहे. 

कऱ्हाड दक्षिण हा कायमच राज्यामध्ये चर्चेचा ठरणारा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघाचे गेली ३५ वर्षे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी नेतृत्व केले. मागील वेळी त्या मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाली. त्यामुळे तेथे श्री. उंडाळकर यांनी अपक्ष तर युवा नेते अतुल भोसले यांनी भाजपकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली. राज्यामध्ये प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांना जनतेने कौल दिला. माजी मंत्री श्री. उंडाळकर यांचा दांडगा जनसंपर्क असूनही व भाजपची हवा होऊनही तेथे श्री. चव्हाण निवडून आले. त्यानंतरही तिन्ही गटांकडून सातत्याने मतदारसंघाशी संपर्क ठेवण्यात येतो. त्यातच माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी मध्यंतरी मी कऱ्हाड दक्षिणमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पुन्हा राजकीय वातावरण तापले असून, उंडाळकर व चव्हाण गटाच्या मनोमिलनासंदर्भातही उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यातच भाजपने नुकतेच श्री. भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपकडूनही जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. 

कऱ्हाड उत्तर हा ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून राज्याला परिचित आहे. त्यांच्यानंतर अनेक दिग्गजांसह ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी त्या मतदारसंघाचे नेतृत्व केले. गेली चार ‘टर्म’ आमदार बाळासाहेब पाटील हे त्या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. 

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मतदारसंघातील गावांमध्ये त्यांचा संपर्क असतो. तेथे यापूर्वी अनेक उमेदवारांनी आपले सर्वस्व पणाला लावून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार पाटील यांनाच तेथे बहुमत मिळाले. सध्या भाजपने कऱ्हाड उत्तरमधील उमेदवार म्हणून श्री. घोरपडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title: north & south karad BJP Politics