शहरातील उड्डाणपूल अन्‌ विमानतळाला लागेना मुहूर्त : 18 अडथळ्यांमुळे विमान उतरेना 

शहरातील उड्डाणपूल अन्‌ विमानतळाला लागेना मुहूर्त : 18 अडथळ्यांमुळे विमान उतरेना 

सोलापूर : जुना पूना नाका ते पत्रकार भवन आणि बोरामणी नाका ते पत्रकार भवन या दोन उड्डाणपुलांचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. परंतु, भूसंपादनासाठी लागणाऱ्या 300 कोटींच्या निधीअभावी उड्डाणपुलांच्या कामाला अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. दुसरीकडे विमानसेवा सुरळीत होण्याकरिता 18 अडथळे असले तरीही श्री सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणी पाडण्याचाच अट्टाहास धरला जात आहे.

माजी केंद्रीयमंत्र्यांना परभवाचा धक्‍का देत मोदी लाटेत मतदारांनी भाजपच्या ऍड. शरद बनसोडे यांना संधी दिली. भाजपच्या माध्यमातून शहर-जिल्ह्याचा काहीतरी विकास होईल, अशी अपेक्षा मतदारांना होती. महापालिका निवडणुकीपूर्वी शहरवासीयांना दररोज पाणी मिळेल, उद्योग वाढतील व त्यातून रोजगार उपलब्ध होईल, असा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यानुसार महापालिकेत प्रथमच भाजपची एकहाती सत्ता आली. मात्र, परिस्थिती "जैसे थे'च असल्याचे दिसून येते. विकासाचा आग्रह धरणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागरिकांना खूप अपेक्षा आहेत.

सिद्धेश्‍वर कारखान्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार 
सोलापूर विमानसेवेला अडथळा ठरलेल्या 18 अडथळ्यांपैकी श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी हटविण्याची प्रक्रिया मागील वर्षभरापासून सुरू आहे. कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी नाशिकच्या कंपनीने ऑनलाइन निविदा भरली, परंतु काही दिवसांनंतर त्यांनी अतिरिक्‍त रकमेची मागणी केली. त्यामुळे चिमणीचे पाडकाम रखडले असून आता 21 ऑक्‍टोबरपासून गाळप हंगाम सुरू होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा वाद निर्माण होऊ नये, यासाठी कारखान्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

ठळक बाबी... 
- भूसंपादित होणाऱ्या जागा, इमारती मालकांना वाढीव रकमेची अपेक्षा 
- शहरातील वाढत्या अपघातांवर व सुरळीत वाहतुकीसाठी उड्डाणपुलांची गरज 
- उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी महापालिकेकडून 300 कोटींची मागणी 
- उद्योगवाढीच्या दृष्टीने विमानसेवा सुरळीत होण्याची गरज 
- विमानतळ विकास प्राधिकरणाने सुचविलेल्या 18 अडथळ्यांची शर्यत संपेना 
- बोरामणी विमानतळाची प्रक्रिया ठप्प तर होटगी विमानतळाचा प्रश्‍न प्रलंबितच 
- परराज्यात अथवा परदेशात जाण्याकरिता मुंबई विमानतळावर जावे लागते सोलापूरकरांना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com