नोटाबंदीची झळ अद्याप कायम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

कोल्हापूर - शहरातील पन्नास टक्के एटीएम सुरू झाली असली तरी अद्याप जिल्हा बॅंकेला चलनपुरवठा होत नसल्याने नोटाबंदीची झळ कायम आहे. वर्षाखेरीस पाच दिवस उरले असताना चलनपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत व्यवहार थंडच राहण्याची शक्‍यता आहे. 

शहर आणि उपनगरातील सुमारे पन्नास टक्के एटीएम सुरू झाल्याचे दिसते. तेथे रांगाही दिसत आहेत; पण रांगेतील लोकांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. 45 दिवसांनंतर चलनपुरवठ्याची लोकांना आता सवय झाली आहे. आहे त्यात भागवणे चालू आहे. नवीन वर्षात तरी सर्व काही सुरळीत व्हावे, अशी लोकांची माफक अपेक्षा आहे. 

8 नोव्हेंबरला पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे लोकांमध्ये आणि बाजारात खळबळ उडाली. त्यानंतर आजअखेर व्यवहार सुरळीत झालेले नाहीत. शेतकरी, मजूर, किरकोळ व्यापारी, फेरीवाल्यांसह लहान व्यावसायिकांना या निर्णयाचा फटका बसला आहे. जिल्हा बॅंकांना चलनपुरवठा अजूनही होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यवहार कासवाच्या गतीने सुरू आहेत. याचबरोबर खरेदी-विक्रीचे व्यवहारही थंडावल्याचे चित्र आहे. नव्या वर्षात सर्वसामान्यांचा त्रास कमी होईल, असे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे. प्रत्यक्षात चलनपुरवठा सुरळीत होईल का, याबाबत मतमतांतरे व्यक्त होत आहेत. 
 
पाचशेच्या नोटा आल्याने दिलासा 
सध्या दोन हजार रुपयांच्या नोटांबरोबरच पाचशेच्या नोटाही उपलब्ध झाल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील आठवडा भरात एटीएम आणि बॅंकांतील रांगा कमी होतील. जिल्हा बॅंकांना चलनपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर बाजार पेठेतील व्यवहारांना गती येण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Notabandi affected