नोटाबंदीचा निर्णय जनतेच्या माथी मारला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

कोल्हापूर -मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय जनतेच्या माथी मारल्याची टीका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी केली. 

देविदास तुळजापूरकरलिखित "नोटाबंदीचा गोंधळ' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. श्रमिक प्रतिष्ठानने पुस्तक प्रकाशित केले आहे. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमास प्रा. विलास रणसुभे, चंद्रकांत परुळेकर, चिंतामणी मगदूम, उमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

डॉ. पाटील म्हणाले, ""निश्‍चलनीकरणाचा निर्णय अर्थव्यवस्थेसाठी गचका आहे. 86 टक्के चलन बाद करताना त्याचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, याचा विचार झाला नाही. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी हा काही एकमेव मार्ग नाही. अशा पैशाची उगमस्थाने वेगवेगळी आहेत. या निर्णयामुळे अर्थव्यवस्था ठिसूळ झाली. रोजगारात कपात झाली. आर्थिक स्रोत बंद झाला. काळा पैसा काही नोटांच्या बंडलात नसतो, तर तो स्थावर मालमत्ता आणि दागिन्यांमध्ये असतो. मात्र नेमका त्याचा विसर केंद्र सरकारला पडला. 1978 ला नोटाबंदी झाली त्या वेळी दहा टक्के चलन बाहेर आले, त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. या निर्णयामुळे सामान्यांचे, रुग्णांचे हाल झाले. प्रत्येक व्यवहार धनादेशावर होत नसतो. अर्थव्यवस्थेतील छोट्या घटकांना रोखीनेच व्यवहार करावे लागतात. ज्यांचा नोटाबंदीशी काही संबंध नाही अशांना झळ बसली. यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. यातून सावरायला आणखी कालावधी लागेल.'' 

Web Title: Notabandi gondhal book publishing