सांगलीत उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना आयुक्तांची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

सांगली : महापालिका निवडणुकीच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी असमाधानकारक आहे. त्याचा खुलासा करावा, अशी खरमरीत नोटीस निवडणूक अधिकारी तथा मनपाचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक किर्ती शेंडगे यांना काढली आहे. 

सांगलीतील विश्रामबाग परिसरातील हॉटेल रत्नामध्ये बुधवारी पोलिस कर्मचाऱ्याचा खून झाला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल सील करण्याचीही तसदी घेतली नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सील ठोकण्यात आले. त्यानंतर वॉइन शॉपीत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू साठा मिळून आला. तेथेही पोलिसांनी कारवाई केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी या प्रकरणी कारणे दाखवा, नोटीस बजावली आहे. 
महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर दारू दुकाने, हॉटेल्स यांच्यावर नजर ठेवण्यासाठी पालिकेने 27 भरारी पथके नेमली आहेत. परंतू, ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे येते. निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर त्याच्याकडून कोणतीही ठोस कारवाई दिसत नसल्याचेही नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे. 

एका कर्मचाऱ्याचे निलंबन 
निवडणूक विभागात विविध परवान्यांसाठी पैशांची मागणी करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यास आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी आज निलंबन केले. मोशे शशिकांत काटे असे त्याचे नावे आहे. प्रशासकीय कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही खेबुडकर यांनी दिला. 

Web Title: notice to excise duty by collector in sangali