एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

कोल्हापूर - वेळेत एफआरपी न देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांना आज प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांनी नोटीस दिली. भोगावती, कुंभी, राजाराम, डी. वाय. पाटील, राजाराम, संताजी घोरपडे, वारणा, सदाशिवराव मंडलिक, पंचगंगा, इको केन, हेमरस, आप्पासाहेब नलवडे, अथणी शुगर (इंदिरा), उदयसिंह गायकवाड व गुरूदत्त या १५ साखर कारखान्यांचा समावेश असून, शुक्रवारी (ता. २८) याची सुनावणी होणार आहे. मंगळवारी (ता. १८) १४ साखर कारखान्यांची सुनावणी झाली. त्यानंतर आज १५ साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे.  

१५ दिवसांत एफआरपीची रक्‍कम द्यावी लागते. दरम्यान, वेळेत एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांना १५ दिवसांनंतरचे होणारे व्याजही द्यावे लागणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी ६२४ कोटी २८ लाख रुपये एफआरपीची रक्कम अद्याप दिलेली नाही. त्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालक श्री. रावल यांनी प्रत्येक कारखानानिहाय नोटीस बजावली आहे. काही दिवसांची मुदत दिली आहे. 

कारखान्यांकडून याद्यांची तयारी सुरू
यावेळेत एफआरपी जमा न झाल्यास कारखान्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी साखर आयुक्तांना अहवाल दिला जाणार आहे. ही कारवाई टाळण्यासाठी कारखान्यांनी आजपासून याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे. दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर एफआरपीची रक्कम जमा होण्यास सुरवात होईल, अशी अपेक्षा आहे. वेळेत एफआरपी का दिली नाही, यासाठी शुक्रवारी (ता. २८) सुनावणी होणार आहे.

Web Title: Notice to FRP-exhaustive sugar factories