"त्या' तहसीलदारांसह तक्रारदारांनाही नोटीसा

Notice to tehsildar including those complainants
Notice to tehsildar including those complainants

नगर : कार्यालयात महिला कर्मचारी- अधिकाऱ्यांशी लगट करून असभ्य वर्तन केल्याचा आरोप असलेले शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांच्यासह तक्रारदारांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून विशाखा समितीने या नोटिसा दिल्या आहेत. ज्या ठिकाणी म्हणणे मांडण्यासाठी संबंधितांना बोलाविले आहे, त्या जागेबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. म्हणणे मांडल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या कोर्टात अहवाल सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

विशाखा समितीत पाच महिला सदस्य

महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करत असल्याचा आरोप असलेले भामरे सध्या चर्चेचा विषय ठरले. शेवगाव प्रकरण थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांपर्यंत धडकले. संपूर्ण चौकशी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी विशाखा समितीकडे सोपविली आहे. विशाखा समितीत पाच महिला सदस्य आहेत. समितीच्या सदस्य सचिव जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आहेत.

सत्यता पडताळूनच जिल्हा प्रशासनाकडे अहवाल

शेवगाव प्रकरणातील दोन्ही पक्षांना समक्ष उपस्थित राहून खुलासा करण्यासंदर्भात नोटिसा जारी झाल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांना खुलासा करावा लागणार आहे. समितीसमोर म्हणणे सादर केल्यानंतर दोन्ही पक्षांची सत्यता पडताळूनच जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर होईल. दरम्यान, भामरे रजेवर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

रजेच्या नावाखाली ठोकली धूम?

शेवगाव येथील महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तहसीलदार भामरे यांच्यावर आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या प्रकरणी जिल्हाभर संतापाची लाट आहे. भामरे सध्या दहा ते बारा दिवसांच्या रजेवर गेले आहेत. नागरिकांचा वाढता संताप पाहता, भामरे यांनी रजेच्या नावाखाली धूम ठोकली असल्याचीच चर्चा संध्या रंगली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com