esakal | हद्दपारीच्या धसक्‍याने पळाले संशयित ; कऱ्हाड पोलिसांकडून गुन्हेगारांना नोटिसा
sakal

बोलून बातमी शोधा

हद्दपारीच्या धसक्‍याने पळाले संशयित ; कऱ्हाड पोलिसांकडून गुन्हेगारांना नोटिसा

ग्रामीण भागातही भाईगिरी वाढू लागली आहे. त्यांच्या टोळ्यांतही वर्चस्ववादाची ठिणगी पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा संशयितांवरही कारवाईसाठी तालुका पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत संबंधितांनाही नोटिसा देवून त्यांच्यावरही तात्पुरत्या हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. 

हद्दपारीच्या धसक्‍याने पळाले संशयित ; कऱ्हाड पोलिसांकडून गुन्हेगारांना नोटिसा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता गणेशोत्सव शांततेत होण्यासाठी पोलिसांनी त्रासदायक ठरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. त्याअंतर्गत उत्सव काळात शहर व परिसरातील तब्बल 150 जणांवर हद्दपारीची कार्यवाही पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे संबंधितांना उत्सव काळात हद्दपार व्हावे लागणार आहे. त्याचा धसका घेऊन अनेक संशयित गुन्हेगार पोलिसांची नोटीस मिळायच्या अगोदरच पळाल्याचे दिसत आहे. 
कऱ्हाडची पोलिस दरबारी संवेदनशील शहर म्हणून ओळख आहे. त्यामुळे कऱ्हाडवर पोलिसांची करडी नजर असते. शहरातील गुंडांच्या टोळ्यांतील वर्चस्ववादाच्या कारवायांमुळे कऱ्हाड शहर प्रकाशझोतात येत आहे. गुंडांच्या टोळ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी पोलिसांनी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. मध्यंतरी पवन सोळवंडे याचा गोळ्या घालून खून करण्यात आला. शहरातील टोळ्यांमध्ये वर्चस्ववादातून होणारी मारामारी, गोळीबार हे शहरातील शांततेला बाधक ठरत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधितांवर ठोस कारवाई करून कऱ्हाडची गुंडगिरी संपवण्याची भूमिका घेतल्याचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीच जाहीर केले आहे. त्यानुसार पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्याची कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील गोळीबाराच्या घटनेनंतर काही दिवसांतच गणेशोत्सव आल्याने पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली तयार करून त्यांच्यावर कारवाईचा आराखडा तयार केला आहे. गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांनी तब्बल 150 जणांवर हद्दपारीची कार्यवाही प्रस्तावित केली आहे. त्याची अंमलबजावणीही पोलिसांनी सुरू केली आहे. त्याअंतर्गत काही जणांना नोटिसाही देण्यात आल्या आहेत. उर्वरित संबंधितांना त्या देण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, उत्सव काळात हद्दपार व्हावे लागणार असल्याने त्याचा धसका घेऊन अनेक संशयित गुन्हेगार पोलिसांची नोटीस मिळायच्या अगोदरच पळाल्याचे दिसत आहेत. 

कऱ्हाड तालुक्‍यातही कारवाई 

गुंडगिरीचे लोन ग्रामीण भागातही पोचले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही भाईगिरी वाढू लागली आहे. त्यांच्या टोळ्यांतही वर्चस्ववादाची ठिणगी पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा संशयितांवरही कारवाईसाठी तालुका पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत संबंधितांनाही नोटिसा देवून त्यांच्यावरही तात्पुरत्या हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. 

loading image
go to top