एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

कोल्हापूर - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी वेळेत एफआरपी न दिल्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. एफआरपीसोबत १४ दिवसांनंतरचे होणारे व्याजही जमा करण्याचे आदेशही रावल यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कारखानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यासह जवाहर, डालमिया, बिद्री कारखाना, चंदगड, शिरोळचा दत्त कारखाना, शरद कारखाना यांचा यात समावेश आहे. सांगलीतील राजारामबापू पाटील साखराळे युनिट -१, वाटेगाव युनिट -२, कारंदवाडी युनिट -३, हुतात्मा किसन अहिर; वाळवा, क्रांती; कुंडल, श्री दत्त इंडिया संचालित वसंतदादा कारखाना, सोनहिरा कारखाना यांचा यात समावेश आहे.

दोन्ही जिल्ह्यांतील या कारखान्यांनी ६२४ कोटी २८ लाख रुपये इतकी एफआरपीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यामुळे प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कारणे दाखवा नोटिसा बजावली आहे. कारखान्यांनी ता. १८ पर्यंत खुलासा करण्याच्या सूचनाही आहेत.

Web Title: Notices to FRP tireless factories