सहा एकरपेक्षा जास्त शेतीला आता पाणी बंद 

सुनील पाटील - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 7 जानेवारी 2017

कोल्हापूर - सहा एकरपेक्षा जास्त ऊस घेणाऱ्या शेतकऱ्यांना पाणीपुरवठा मंजुरी नाकारली जाणार आहे. जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांतर्गत नद्यांवर शासनाने बांधलेल्या कोल्हापूर बंधाऱ्यावरील व सांगली जिल्ह्यातील वारणा नदीतून पाणी घेऊन पीक घेणाऱ्या सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्था व वैयक्तिक बागायतदारांसाठी पाटबंधारे विभागाने हा आदेश काढला आहे. सहा एकरपेक्षा जास्त शेतीला पाणी वापरणाऱ्यांना अनधिकृत ऊस पीक म्हणून दंडात्मक कारवाई होणार आहे. 

जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षभर पाणीपुरवठा झाला पाहिजे, यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला पीक घेण्याची मर्यादा घातली आहे. सहा एकरपेक्षा जास्त शेतीला (2 हेक्‍टर 40 गुंठे) पाणी देऊ नये, असा आदेश पाटबंधारे विभागाने काढला आहे. एखाद्याकडे दहा ते वीस एकरपेक्षा जास्त शेती आहे, अशा शेतकऱ्यांना जास्त पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात अल्पभूधारकांवर अन्याय होतो. भविष्यात पाणीटंचाई होऊ नये, सर्वांना समान पाणीवाटप व्हावे, यासाठी सहा एकरपेक्षा जास्त ऊस पीक घेणाऱ्यांना पाणी मिळणार नाही. सहकारी संस्थांनाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. पाणीपुरवठा संस्थेची परवानगी घेताना सभासदांसह वैयक्तिक व ज्यांची सहा एकरपेक्षा जास्त शेती आहे अशा शेतकऱ्यांच्या क्षेत्राची माहिती द्यावी लागणार आहे. संस्थांना पाणीपुरवठ्याची मंजुरी घेतानाच ही खबरदारी घ्यावी लागणार असून, जास्त पाणीपुरवठा केल्यास संस्थांनाही कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच, संस्था व वैयक्तिक शेतकऱ्यांनी पाणीपुरवठ्याची परवानगी घेताना जुनी थकबाकी पूर्णपणे भरणे बंधनकारक आहे. थकबाकीदार शेतकरी व संस्थेला नवीन पाणी उपसा परवाना दिला जाणार नाही. 

जिल्ह्यातील शेती क्षेत्र हेक्‍टरमध्ये 
लागवडीयोग्य क्षेत्र - 4 लाख 76 हजार 600 
खरीप उसासह - 3 लाख 93 हजार 869 
रब्बी हंगाम - 41 हजार 100 
उन्हाळी हंगाम - 5 हजार 50 
उसाचे सर्वसाधारण क्षेत्र - 99 हजार 600

Web Title: Now more than six acres of farm close to water