Loksabha 2019 : आता विरोधकांत दम राहिला नाही - राम शिंदे 

nagar
nagar

नगर - "डॉ. सुजय विखे पाटील भाजपमध्ये आल्यानंतर झालेल्या भूकंपाच्या लहरी दिल्लीपर्यंत गेल्या. निवडणुकीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हतबल झालेले दिसतील. आता विरोधकांमध्ये दम राहिला नाही. डॉ. विखेंविरुद्ध प्रचारासाठी देशाचे नेतृत्व जिल्ह्यात येणार असेल, तर आमचे कार्यकर्तेच त्यांना उत्तर देतील,'' अशी टीका पालकमंत्री राम शिंदे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. 

डॉ. सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीसाठी एकत्रित बैठक झाली. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी डॉ. सुजय विखे पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, माजी आमदार बबनराव पाचपुते, अनिल राठोड, चंद्रशेखर कदम, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, अण्णा शेलार, अभय आगरकर आदी उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले, "डॉ. विखे यांना उमेदवारी मिळाली तेव्हाच सर्व काही माफ झाले. निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, विखेसमर्थक यांनी एकत्र येऊन समन्वय साधला पाहिजे. मंगळवारी (ता. 26) नंदनवन लॉन येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत एक एप्रिलला उमेदवारी अर्ज भरला जाईल. डॉ. विखे यांची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांच्या भाजपप्रवेशाच्या दणक्‍याने कॉंग्रेस-"राष्ट्रवादी' मेटाकुटीला आले आहेत.'' 

पाचपुते म्हणाले, "तुम्ही आमच्याकडे कसे, असे म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्या सर्वांचा मेळ घालावा लागेल. मागच्या वेळी युती झाली असती, तर माझं बरं झालं असतं. बाहेर तरी राहावं लागलं नसतं. आता आमदार कर्डिलेंवर जास्त जबाबदारी आहे.'' तुमची किंमत वाढवा; पण काय किंमत वाढवायची ती वरूनच वाढवा, अशी कोपरखळी मारून, डॉ. विखे यांना जास्तीत जास्त मताधिक्‍य देऊ, असे ते म्हणाले. 

असताना सत्तेत होतो. भाजपमध्ये आल्यानंतर मला कोणताही पश्‍चात्ताप झाला नाही. सन्मान, प्रेम मिळाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर टाकली. ती मी पूर्ण करणार आहे. विखे राज्यात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी निवडून येतील.'' 

युती होणार, याची पक्की खात्री होती, असे औटी यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी प्रास्ताविक, श्‍याम पिंपळे यांनी सूत्रसंचालन केले. 

मला माफ करा : विखे 
"लोकसभा निवडणुकीचे काम सुरू दोन वर्षांपूर्वी सुरू केले. गावागावांत आरोग्य शिबिरे घेतली. त्या वेळी काही अपशब्द बोललो असेल तर माफ करा. आता मी भाजपमध्ये आलो आहे. मुलगा म्हणून सांभाळून घ्या,'' असे भावनिक आवाहन डॉ. सुजय विखे यांनी भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना केले. 

"हजर-गैरहजर'चा "खेळ' 
भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार यांनी हजेरी लावून चक्क भाषण केले, तर माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार यांनीही हजेरी लावली. दरम्यान, भाजपचे काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी बैठकीला दांडी मारली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com