'मुख्यमंत्री आता आम्ही ठरवू'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

- शेतकरी संघटना करणार राज्यभर ''दर्शन अंदोलन, दुर्लक्ष आंदोलन ''
- संयुक्त अधिवेशनात निर्णय 
- तिसरा पर्याय देण्यासाठी संघटन 

शिर्डी  (जि. नगर) : काॅग्रेसचा निधर्मवाद आणि भाजपाचा धर्मवाद यामध्ये डूबणारया देशाला वाचवण्यासाठी शेतकरयांना उठाव करावा लागणार आहे. छोटे संघटना बरोबर घेऊन लढावे लागणार आहे. भ्रष्ट आणि लुटारू व्यवस्था उभी करण्यासाठी एक माणुस पुरेसा आहे. आता राज्याचा मुख्यमंत्री पक्ष, नेते नव्हे शेतकरी ठरवणार आहेत असे अधिवेशनात जाहीर करण्यात आले. 

शेतकरी संघटनेच्या  (शरद जोशी प्रणित) चौदाव्या संयुक्त अधिवेशनाचा आज खुल्या  अधिवेशनाने समारोप झाला. पंजाबचे शेतकरी नेते, माजी खासदार भुपेंद्रसिंग मान,  माजी आमदार वामनराव चटप, सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट, मानवेंद्र काचोळे, गुणवंत पाटील हंगरगेकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सतीश दाणी, गोविंद जोशी, दिनेश शर्मा, देविदास पवार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापुराव आढाव, अनिल चव्हाण, शैला देशपांडे, अभिमन्यु शेलार, शिवराज पाटील, शंकरराव गायकवाड यांची उपस्थिती होती.

आतापर्यंत निवडणूका जात, धर्माच्या नावावर होत आल्या. आता निवडणूका कृषी धोरणांवर झाल्या पाहिजेत. सरकारने काही देऊ नये; पण जे शेतकरयाचे वाटोळे सुरू आहे ते थांबवण्यासाठी हस्तक्षेप थांबवावा. डूबत असलेले राज्य, देश वाचवण्यासाठी रूमण्याची ताकद मतपेटीतून दाखवा.

येणारी निवडणूक कृषी धोरणांवर झाली पाहिजे. त्यासाठी आता प्रत्येक गावांत कृषी धोरणांवर नेते बोलले नाही तर उठून जा. असे ''दुर्लक्ष आंदोलन'' करायचे आहे. भविष्यात निर्यातबंदी केली केली रस्त्यावर येऊन 'दर्शन आंदोलन '' करणार आहोत. रस्ते बंद करणार आहोत. जो पक्ष कर्जमुक्ती करेल, समाजवाद सोडून स्वतंत्रवाद करेल त्या सोबत रहायचे आहे असा निर्णय अधिवेशनात जाहीर करण्यात आला.

संघटनेच्या खुल्या अधिवेशनात ठराव पास करून भविष्यातील भूमिका जाहीर करण्यात आली.  राज्यात आणि देशात होत असलेल्या निवडणूकाच्या पाश्वभूमीवर संघटनेची भूमिका ही कृषी धोरण ही असणार आहे. शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन उभारण्यासाठी 9 व 10 जानेवारीला दिल्लीत ऑल इंडिया किसान समन्वय समितीची दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. तर 11 फेब्रुवारीला देशभरातील शेतकरी एकत्र येऊन दिल्लीत राजघाटावर एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. वसुली अधिकारयाना प्रवेश बंदी करणार आहोत. वेळ प्रसंगी तुरूंग भरा आंदोलन करणार आहोत.

यावेळी घनवट म्हणाले ''शेतकरयाच्या खिशात पैसा आला तर सुखी दिसतील; पण पैसाच येऊ देत नाहीत. एकही प्रक्रिया उद्योग उभारत नाहीत. हे किती दिवस हे सुरू राहणार. येणारी निवडणूक कृषी धोरणांवर झाली पाहिजे. त्यासाठी आता प्रत्येक गावांत कृषी धोरणांवर नेते बोलले नाही तर उठून जा. असे ''दुर्लक्ष आंदोलन '' करायचे आहे. जो पक्ष कर्जमुक्ती करेल, समाजवाद सोडून स्वतंत्रवाद करेल त्या सोबत रहायचे आहे. एक पक्ष समाजवादी भूमिका सोडायला तयार नसेल तर आपल्या स्वतंत्र भारत पक्षातून लढणार आहोत. आपन तिसरा पर्याय देणार आहोत.

 भाव पाडण्यासाठी सरकारने निर्यात बंदी केली त्याच दुसरया दिवशी रस्त्यावर येऊन ''दर्शन अंदोलन'" करणार आहोत. माजी आमदार वामनराव चटप म्हणाले, 'राज्यावर चार वर्षापुर्वी 2 कोटी 12 लाख कोटींचे कर्ज होते. आता 4 लाख 61 हजार लाख कोटी कर्ज आहे. नोकरभरती बंद आहे. शेतकरी कर्जमाफीचे अर्धे पैसे देणे बाकी आहे. त्यामुळे डूबणारे राज्य वाचवायचे आहे.  कांदा रस्त्यावर फेकला, शेतकरी बरबाद होत आहे. एकही आमदार , खासदार त्यावर बोलले नाहीत. व्यवस्थे विरूद्ध आवाज उठवायचा आहे. राग दाखवावा लागेल आणि रूमण्याची ताकद पतपेटीतून दाखवा. यावेळी  खुल्या अधिवेशनात संघटनेसाठी काम करणारया कार्यकत्याचा यावेळी सत्कार करण्यात आला. सुधीर बिंदु यांनी सुत्रसंचालन केले तर बापुराव आढाव यांनी आभार मानले.

तिसरा पर्याय देण्यासाठी संघटन 
देशातील शेतकरयाची स्थिती आणि होणारी लुट, मतासाठी जात, धर्माचा होणारा वापर थांबवण्यासाठी आगामी निवडणूकात तिसरा पर्याय देण्याची आखणी करून संघटना केले जात आहे. त्यासाठी समविचारी पक्ष, संघटनां, चळवळीला बरोबर घेऊन काम सुरू केले आहे. स्वतंत्र भारत पक्ष यासाठी पुढाकार घेत आहे. त्याचा पहिला प्रयोग विदर्भात केला असून सर्व विदर्भ वाद्यांना बरोबर विदर्भ निर्माण महामंच स्थापन केला आहे. शेकरयाचे नुकसान करणारी व्यवस्था फक्त शेतकरी उखडून टाकू शकतो. अन्य शेतकरी संघटना एकत्र करण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला, अजूनही प्रयत्न करू, आले तर ठीक नाहीतर तर आम्ही पुढे जाऊ असे संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी सांगितले. 

Web Title: Now we decide the Chief Minister