पुरातत्व खात्याचाच आता अभ्यास करावा लागेल : निलम गोऱ्हे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

सोलापूर : सोलापूर असो की पुणे, कोल्हापूर अथवा सातारा यासह अन्य शहर-जिल्ह्यांमधील जुन्या इमारतींची दुरावस्था झाली आहे. तरीही पुरातत्व खात्याकडून त्याची देखभाल-दुरुस्ती वेळेवर केली जात नाही. पुण्यातील शनिवारवाडा परिसरातील अनेक इमारतींची पडझड सुरु असून अनेकांचा जीव धोक्‍यात असतानाही पुरातत्व खात्याकडून काहीच ठोस उपाय केले जात नाहीत. त्यामुळे आता पुरातत्व खात्याचाच अभ्यास करण्याची वेळ आल्याची खंत आमदार निलम गोऱ्हे यांनी व्यक्‍त केली. 

राज्यातील अनेक ऐतिहासिक (हेरिटेज) इमारतींची पडझड सुरु झाली आहे. शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणच्या हेरिटेज इमारतींमुळे विकासकामांना अडथळा निर्माण झाला आहे. चीन मध्ये एक जुना रस्ता सोडला तर अन्य ऐतिहासिक ठिकाणांची दुरुस्ती करण्यात आली असून नव्या पध्दतीने बांधकामे त्या ठिकाणी करण्यात आली आहेत. आपल्याकडे मात्र, जुन्या ऐतिहासिक इमारतींची दुरावस्था झाली असून एकविराआई मंदिराच्या पायऱ्यांची पडझड झाली आहे. मात्र, पुरातत्व विभाग त्याबाबतीत काहीच करत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पुरातत्व विभागाने स्वत: अथवा संस्थेच्या माध्यमातून अशा ठिकाणांची देखभाल-दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून परवानगीच मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे आता पुरातत्व विभागाचाच अभ्यास करावा लागेल, असे आमदार गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. 

भूखंड माफियांना शिकवला जाईल धडा 
सोलापुरातील ऐतिहासिक एनजी मिलच्या पाडकामाला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली असून मिलच्या एकूण जागेच्या एक तृतांश भाग गिरणी कामगारांसाठी तर एक तृतांश भाग मालकाचा असेल. तसेच उर्वरित एक तृतांश भागात नियोजित कामे करावीत, असा नियम आहे. या नियमांनुसार एनजी मिलचे नियोजन करण्यात आले आहे की नाही, याचा अभ्यास केला जात आहे. अनेक भूखंड माफियांना आम्ही धडा शिकवला असून एनजी मिलच्या जागेवर कोणाचा डोळा असल्यास त्यांनाही धडा शिकवला जाईल, असा इशारा आमदार निलम गोऱ्हे यांनी दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: now we have to study of Archaeological department says Nilam Gorhe