विचारतोय कोण बिनधास्त ढोसा... 

राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 3 डिसेंबर 2016

कोल्हापूर - वाढदिवस, पार्टी अगर थर्टी फस्टचा जल्लोष असो बिनधास्त मद्य ढोसून जल्लोष करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. खुले मैदान, बागबगिचांसह मोकळ्या जागेचा खुलेआम वापर यासाठी केला जात आहे असून कारवाईच्या अभावामुळे मद्य पिण्यालाही परवाना आवश्‍यक असतो याचा विसरच मद्यपींना पडला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शहरातून कायमस्वरूपी 95 तर वार्षिक 55 मद्य पिण्याचे परवाने वितरित करण्यात आले असल्याचे निरीक्षक एस. आर. जाधव यांनी सांगितले. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य पिण्यालाही परवाना बंधनकारक केला आहे. सुरवातीला त्याची धास्ती मद्यपींनी घेतली. अनेकांनी परवाने काढून घेतले. विभागाने पोलिसांच्या मदतीने विना परवाना मद्य पिणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला. याच धास्तीने परवाना असल्या शिवाय बाहेर जाऊन मद्य पिण्याचे धाडस सहसा कोणी करत नव्हते. कालांतराने कारवाई थंडावत गेली. परवाना नसलेले मद्यपी बारमध्येच नव्हे तर खुल्या मैदानापासून रस्त्याच्या कडेलाही बिनधास्तपणे मद्य ढोसण्याचे धाडस करू लागले. वाहन चालविण्यासाठी, बंदुकीसाठी फक्त परवाना आवश्‍यक आहे. मद्यासाठी परवाना लागतो ही बाब तर आजच्या तरुणाईला माहीत सुद्धा नाही. 

पोलिसांकडून ड्रंक ऍन्ड ड्राईव्ह अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र त्यांच्याकडे मद्य प्राशन करण्याचा परवाना आहे की नाही ते तपासले जात नाही. सध्या तरुणाईत मद्य पिणे ही एक फॅशन बनू लागली आहे. मुलगा महाविद्यालयात गेल्यानंतर शिक्षण घेतो की आणखी काय काय उद्योग करतो याची चिंता पालकांना वाटू लागली आहे. थर्टी फस्टच्या जल्लोषाचे नियोजन महाविद्यालय आणि गल्लोगल्ली उभ्या असणाऱ्या टोळकी करू लागली आहेत. त्यांच्यावर वचक ठेवण्याची गरज आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने थर्टी फस्टच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा मद्य प्राशन परवाना तपासण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी पालकांतून जोर धरू लागली आहे. 

कारवाईतील अडचणी 
- तपासणी करणाऱ्या स्वतंत्र यंत्रणेचा अभाव 
- मद्यपींना ठेवण्यासाठी कस्टडीचा अभाव 
- वैद्यकीय चाचणीसाठी आवश्‍यक मनुष्यबळ 

मद्य पिण्याचा परवाना शुल्क ः 
देशी मद्य - दोन रुपये प्रतिदिन 
विदेशी मद्य - पाच रुपये प्रतिदिन 
वार्षिक शुल्क - शंभर रुपये 
कायमस्वरूपी - एक हजार रुपये 

Web Title: The number of victims is increasing drinker