पोषण आहाराची ६ कोटींची बिले अादा

रमेश पाटील
बुधवार, 26 एप्रिल 2017

बचत गटामधून समाधान - ३ हजार ४२ शाळांतील ३ लाख ४० हजार विद्यार्थ्यांना लाभ

म्हाकवे - केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना महिला बचत गटांमार्फत शाळांमध्ये राबवली जाते. या योजनेची इंधन व भाजीपाला बिले ऑक्‍टोबर २०१६ ते एप्रिल २०१७ अखेर थकली होती. इंधन व भाजीपाला बिल थकल्यामुळे बचत गटातील महिलांना आर्थिक झळ पोचत होती. शासनाने पाच महिन्यांचे इंधन व भाजीपाला बिल ६ कोटी २२ लाख ८७ हजार ६३१ रुपये तालुकास्तरावर वर्ग केल्यामुळे महिला बचत गटामधून समाधान व्यक्त होत आहे. 

केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेचा लाभ पहिली ते आठवी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येतो. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच अनुदानित, अंशत: अनुदानित खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ही योजना राबविली जाते. योजनेमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन शंभर ग्रॅम तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन दिडशे ग्रॅम तांदूळ शिजवून दिला जातो. जिल्ह्यात पहिली ते पाचवीची पटसंख्या २ लाख ४० हजार ७२६ असून त्यापैकी १ लाख ९१ हजार १७४ इतके लाभार्थी आहेत. तसेच सहावी ते आठवीची पटसंख्या १ लाख ६९ हजार ११५ असून १ लाख ४८ हजार ४२१ असे एकूण ३ लाख ३९ हजार ५९५ लाभार्थी शिक्षण संचालक यांनी मंजूर केले आहेत. पहिली ते पाचवीच्या १२२८ व सहावी ते आठवीच्या १८१४ अशा ३०४२ शाळांमध्ये पोषण आहार देण्यात येतो.

शालेय पोषण आहार योजनमध्ये शासन कडधान्य, चटणी, धान्य व तेल आदी साहित्य पुरवते. अनेक शाळेत सरकारने दिलेल्या मूग, हरभरा, वाटाणा या धान्यांना किड लागलेली असते. शालेय पोषण आहाराचा ठेका बचत गटांना देण्यात येतो. बचत गटातीलच सदस्य महिलांना हे काम देण्यात येते. हा ठेका चालवणाऱ्या अनेक महिला या गरीब व गरजू असल्याने काम स्वीकारतात.  महिलांची आर्थिक कुवत नसतानाही या ना त्या महिन्यात बिले मिळतील या आशेवरच आहार शिजवून दिला जात आहे. तर काही दुकानदारांनी या महिलांना उधारीवर सरपण/गॅस देणे बंद केले होते त्यामुळे महिला हवालदिल झाल्या होत्या; परंतु सध्या पाच महिन्यांची बिले वर्ग झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.   

शहरी व ग्रामीण भागातील शाळांचे इंधन व भाजीपाला अनुदान तालुकानिहाय पहिली ते आठवीपर्यंत असे - 
आजरा (२० लाख ५१ हजार १६९), भुदरगड (२५ लाख ३१ हजार ८९०), चंदगड (३३ लाख ४६ हजार ३९९), गगनबावडा (७ लाख १७ हजार २२६ ), गडहिंग्लज (३१ लाख ७७ हजार २८६), हातकणंगले (७८ लाख १९ हजार ६५७), करवीर (७३ लाख १३ हजार ३१), कागल (४५ लाख ३३ हजार ५५५), पन्हाळा (४२ लाख ८९ हजार ३३४), राधानगरी (३५ लाख ६३ हजार १२१), शाहूवाडी (३४ लाख ८५ हजार ५७४), शिरोळ (५१ लाख ४५ हजार ४११), महानगरपालिका (६९ लाख २० हजार ३३९), इचलकरंजी नगरपालिका (४९ लाख २२ हजार ४६३), जयसिंगपूर नगरपालिका (९ लाख ९७ हजार ४६९), कागल नगरपालिका (४ लाख ९८ हजार ०५), गडहिंग्लज नगरपालिका (८ लाख ५० हजार ६२२).

Web Title: nutrician food 6 crore bill paid