ओबीसी कार्यकर्त्यांच्या तोंडाला फासले काळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

सोलापूर - मराठा आरक्षणासाठी जनसुनावणी घेण्यास आलेल्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या दौऱ्यात मराठा आरक्षणाबद्द्ल आणि मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याने ओबीसी कार्यकर्ते शंकर लिंगे आणि राजन दीक्षित आणि सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी लिंगे व दीक्षित यांच्या तोंडाला  मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. 

मराठा समाज शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्यासाठी संघर्ष करत असताना ओबीसीच्या चमको कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर दिल्याची भावना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आयोगाला निवेदन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यामधील हजारो मराठा बांधव सोलापूरच्या शासकीय विश्राम गृहात दाखल झाले आहेत.

Web Title: OBC activists' faces were blackened