'संगमेश्‍वर'मधील मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

अभिषेक हा वर्गातून बाहेर आल्यानंतर आरोपींनी एकत्र येवून लोखंडी रॉड आणि तलवारीने मारहाण केली.

सोलापूर : संगमेश्‍वर महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अभिषेक प्रतापसिंग चौधरी (वय 18, रा. उत्तर सदर बझार, लष्कर, सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. 16 जुलै रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास संगमेश्‍वर महाविद्यालयात मारहाणीची घटना घडली होती. अभिषेक हा वर्गातून बाहेर आल्यानंतर आरोपींनी एकत्र येवून लोखंडी रॉड आणि तलवारीने मारहाण केली. जखमी अभिषेक यास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर यांनी सांगितले. 

 

Web Title: The offense was filed of fighting in sangameshwar