करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अर्पण सोन्याच्या दागिन्यात वाढ

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अर्पण सोन्याच्या दागिन्यात वाढ

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात यंदा अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यात गेल्यावर्षीपेक्षा वाढ झाल्याचे आढळले आहे. सोन्याचे दागिने 800 ग्रॅमने जास्त आहेत, मात्र चांदीचे दागिने 24 किलोने कमी झाले आहेत. गतवर्षी 34 किलो चांदीचे दागिने जमा झाले होते यावर्षी ते फक्त 10 किलो जमा झाले असल्याची माहिती पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात 2018-19 या वर्षात तीन किलो 432 ग्रॅम जमा झाले आहे. त्याची किंमत एक कोटी 9 लाख 75 हजार 403 रुपये झाली आहे. तसेच दहा किलो 116 ग्रॅम चांदीचे दागिने जमा झाले असून त्याची किंमत चार लाख 10 हजार 746 हजार रुपये झाली आहे. एकंदरीतच पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे वर्षात 22 कोटी 61 लाख 57 हजार 653 रुपये निधी जमा झाला आहे. त्या पैकी 14 कोटी 11 लाख 21 हजार 458 रुपये खर्च झाला असल्याचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.

17 ते 20 जून दरम्यान अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात हे मुल्यांकन करण्यात आले. सराफ पुरुषोत्तम काळे, योगेश कुलथे(मिरज) आणि उमेश पाठक (कोल्हापूर) यांनी मुल्यांकन केले आहे. संपूर्ण मुल्यांकन सीसीटीव्हीच्या माध्यमातून झाले असून पूर्णवेळ सदस्या संगीता खाडे उपस्थित होत्या. 

जोतिबा डोंगरावरील मंदिरात 173 ग्रॅम सोन्याचे दागिने जमा

दरम्यान वाडीरत्नागिरी येथील जोतिबा मंदिरात 173 ग्रॅम सोन्याचे दागिने जमा झाले असून त्याची किंमत पाच लाख पन्नास हजार 819 रुपये इतकी झाली आहे. तर एक किलो 534 ग्रॅम चांदीचे दागिने जमा झाले असून त्याची किंमत 62 हजार 312 रुपये इतकी आहे.

या व्यतिरिक्त देणगीसह इतर निधीतून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात वर्षात एकूण 19 कोटी 81 लाख 18 हजार 144 रुपयांचा निधी जमा झाला आहे. त्यापैकी 10 कोटी 65 लाख 93 हजार 698 रुपये इतका खर्च झाला आहे. तसेच जोतिबा मंदिरात 1 कोटी 30 लाख 17 हजार 451 रुपयांचा निधी जमा झाला आहे. त्यापैकी 1 कोटी 82 लाख आठ हजार 242 रुपये इतका खर्च झाला आहे. येथे जमा निधीपेक्षा खर्च अधिक झाला आहे. या ठिकाणच्या दोन्ही यात्रांमध्ये अधिक सोयीसुविधा भक्तांसाठी पुरवल्यामुळे हा खर्च अधिक झाल्याचेही अध्यक्ष जाधव यांनी सांगितले. 

तसेच देवस्थान कडील इतर मंदिराकडून एकत्रित निधी एक कोटी पन्नास लाख 22 हजार 58 रुपये जमा झाला आहे. त्यापैकी 1 कोटी 63 लाख 19 हजार 518 इतका खर्च झाला आहे. एकंदरीतच पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर आणि इतर देवस्थान कडून एकत्रित 22 कोटी 61 लाख 57 हजार 653 रुपये निधी जमा झाला आहे. त्या पैकी 14 कोटी 11 लाख 21 हजार 458 रुपये खर्च झाला असल्याचेही अध्यक्ष जाधव यांनी जाहीर केले. 

2017-18 
अंबाबाई मंदिर -

सोने - 2626.880 - किंमत - 80 लाख 67 हजार 791 
चांदी - 34 406.370 - किंमत - 13 लाख 21 हजार 204 

जोतिबा मंदिर (वाडीरत्नागिरी) ः

सोने - 446.190 - किंमत 13 लाख 59 हजार 987 
चांदी - 48271.100 - किंमत 18 लाख 53 हजार 610 

एकूण किंमत - एक कोटी 26 लाख 2 हजार 593 

2018 -19 
अंबाबाई मंदिर ः

सोने 3432.720 किंमत - 1 कोटी 9 लाख 75 हजार 403 रुपये 

चांदी 10116.900 किंमत - 4 लाख 10 हजार 746 रुपये 

जोतिबा मंदिर (वाडीरत्नागिरी) ः

सोने 173.760 किंमत - 5 लाख 50 हजार 819 रुपये 
चांदी 1534.800 किंमत - 62 हजार 312 रुपये 

एकूण किंमत - एक कोटी 19 लाख 99 हजार 281 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com