राहुरी फॅक्‍टरीवर देवळाली पालिकेचे कार्यालय 

राहुरी फॅक्‍टरीवर देवळाली पालिकेचे कार्यालय 

राहुरी : ""राहुरी फॅक्‍टरी येथील नागरिकांना विविध कामांसाठी देवळाली नगरपालिकेत जाण्यासाठी चार किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. नागरिकांच्या सुविधेसाठी राहुरी फॅक्‍टरी येथे देवळाली प्रवरा नगरपालिकेचे विभागीय कार्यालय सुरू केले असून, त्याचा लाभ घ्यावा,'' असे आवाहन नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केले. 

समर्थनगर (राहुरी फॅक्‍टरी) येथे पालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी कदम बोलत होते. उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, मुख्याधिकारी अजित निकत, माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, सोसायटीचे अध्यक्ष दिलीप मुसमाडे, शहाजी कदम, नगरसेवक गनी शेख, सचिन ढूस, ज्ञानेश्वर वाणी, नंदा बनकर आदी उपस्थित होते. 

सोयीसाठीच कार्यालय 
कदम म्हणाले, ""पालिकेच्या सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्यासाठी कटिबद्ध आहे. वाढीव पाणीपुरवठा योजना, सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती, व्यायामशाळा, शहरातील विविध भागांतील प्रलंबित रस्ते, घरकुल योजना यांसारखी कामे झाली आहेत. जलतरण तलाव, पथदिवे, प्रत्येक प्रभागात ओपन जिम, भुयारी गटार, यांसारखी अनेक कामे करण्याचा संकल्प आहे. राहुरी फॅक्‍टरी परिसर पालिका हद्दीत असून, येथील नागरिकांना चार किलोमीटरवर पालिकेच्या कार्यालयात कामासाठी जावे लागत होते. राहुरी फॅक्‍टरी येथे पालिकेचे विभागीय कार्यालय सुरू करण्याची नागरिकांची मागणी होती. ती पूर्ण झाल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांचा त्रास कमी होईल.'' 

ही असेल वेळ 
""राहुरी फॅक्‍टरी येथे विभागीय कार्यालयात सुटीचे दिवस वगळता, सकाळी 9 ते 11 वाजेदरम्यान पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नगरसेवक उपस्थित राहतील. रविवारी व शुक्रवारी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यापैकी एक जण नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपस्थित राहील,'' असेही कदम यांनी सांगितले
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com