आटपाडी: तहसील कार्यालयातील अधिकाऱ्याला लाच घेताना अटक

The officer in Tehsil office was caught taking bribe
The officer in Tehsil office was caught taking bribe

आटपाडी - येथील तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी श्रीमती शमशान रफिक तांबोळी यांना जमिनीच्या खरेदी दस्ताची सातबारावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपये लाच घेताना आज सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी एकच्या दरम्यान तहसील कार्यालयाशेजारील साठे नगर चौकातील ओमशांती हॉटेलमध्ये मंडल अधिकारी श्रीमती तांबोळी यांना लाचलुचपत विभागाने पाच हजार रुपये स्विकारताना रंगेहात पकडले. या घटनेने शहरात खळबळ उडाली. परिसरात लोकांनी मोठी गर्दी केली होती. चौकात नेहमीप्रमाणे गजबजाट होता. ओम शांती हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर श्रीमती तांबोळी यांनी संबंधित तक्रारदाराला पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. तक्रारदाराने गावी जमीन खरेदी केली होती. त्याची सातबारावर नोंद करण्यासाठी तांबोळी अडवणूक करीत होत्या. यासाठी त्यानी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. आज पैसे घेऊन ओम शांती हॉटेलवर येण्यास सांगितले होते. श्रीमती तांबोळी हॉटेलवर तक्रारदाराची वाट पाहत बसल्या होत्या. संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे 29 सप्टेंबरला तक्रार नोंदविली होती. त्यानुसार आज तहसील कार्यालय आणि ओम शांती हॉटेल परिसरात सापळा लावला होता. या सापळ्यात तांबोळी सापडल्या. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी तांबोळी यांना आटपाडी पोलिस ठाण्यात नेले. तेथे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com