"कुणी लहान न मोठा, फक्त मराठा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

सोलापूर - मोर्चामध्ये "कुणी लहान न मोठा, फक्त मराठा‘ असा फिव्हर निर्माण झाला होता. सर्वसामान्य आबालवृद्धांसह मराठा समाजातील दिग्गज मान्यवर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

सोलापूर - मोर्चामध्ये "कुणी लहान न मोठा, फक्त मराठा‘ असा फिव्हर निर्माण झाला होता. सर्वसामान्य आबालवृद्धांसह मराठा समाजातील दिग्गज मान्यवर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

जुना पुणे नाका येथे जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी एकवटले होते. पुढारी, नेते व मान्यवर मंडळींना मोर्चामध्ये सर्वांत शेवटी स्थान देण्यात आले होते. मोर्चाच्या अग्रभागी लहान मुली होत्या. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार हनुमंत डोळस, आमदार भारत भालके, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार नारायण पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड, उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, उपमहापौर प्रवीण डोंगरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुकेशिनी देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार ऍड. शहाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळिराम साठे, माजी उपाध्यक्ष संजय शिंदे, शिक्षण समितीचे माजी सभापती विक्रांत पाटील, माजी सभापती रणजितसिंह शिंदे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी अध्यक्ष संतोष पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, ग्रामीणचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, अमोल चव्हाण, जी. के. देशमुख, माजी सभापती शिवाजी कांबळे, रोहन देशमुख, विलास घुमरे, कल्याणराव काळे, राजेंद्र मिरगणे, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धर्मा भोसले, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दास शेळके, ऍड. अर्जुन पाटील, सुनील रसाळे, गणेश वानकर, राजशेखर शिवदारे, पद्मजादेवी मोहिते-पाटील, स्मिता देशमुख, अस्मिता गायकवाड, सीमा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मोर्चात सहभागी झाले.

Web Title: "Oh great, not small, just Maratha '