अरे वा! 14 वर्षात एवढ्यांना मिळाले जीवदान

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

- महापालिका अग्निशमन दलाचे कर्तुत्व
- विजेच्या तारा, मांजातून पक्षांची सुटका
- कावळा, घार, गायींचा समावेश

सोलापूर : महापालिका अग्निशमन दलाने 14 वर्षांत तब्बल 639 प्राणी- पक्ष्यांना जीवदान दिले आहे. पतंगाच्या मांजामुळे अडकलेल्या शेकडो पक्ष्यांची सुटका केली आहे. ही कार्यवाही करताना मनुष्याचाच जीव धोक्‍यात आला आहे, या भावनेने धाडसी कृती केली जाते. एक कबूतर केबलच्या वायरमध्ये अडकले होते. त्याची सुटका करण्यात आली.

यामुळे सांगोल्याची डाळिंब अडचणीत 

आग विझविणे हे अग्निशमन दलाचे मुख्य काम असले, तरी मालमत्ता वाचविणे आणि जीवितहानी होणार नाही यासाठी दलाचे जवान कार्यरत असतात. केवळ माणसांचेच नव्हे, तर शेकडो प्राणी-पक्ष्यांचे जीव वाचवून दलाने कर्तव्य पार पाडले आहे. आपत्कालीन स्थितीत घरांत अडकलेल्या लोकांची सुटका करणे, विजेच्या खांबावरील वायरच्या जंजाळात तसेच झाडावर अडकलेल्या पक्ष्यांची सुटकाही करण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान करतात.

मुलासह वडीलांचा मृत्यू 

वाढत्या शहरीकरणाने भांबावून दुर्घटनाग्रस्त झालेल्या शेकडो प्राणी-पक्ष्यांना गेल्या 14 वर्षांच्या कालावधीत दलाच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले आहे. त्यांना सुखरूप निसर्गात नेऊन सोडले आहे. वास्तविक पाहता, प्राणी आणि पक्ष्यांची सुटका करणे ही जबाबदारी अग्निशमन दलाची नाही; परंतु सामाजिक भान ठेवत नागरिक आणि पर्यावरण मित्रांच्या विनंतीनुसार दल हेही काम करत असते. कावळा, घार, मांजर, विविध प्रकारचे पक्षी, गाय यांचा समावेश आहे.

रत्नागिरीतील ३१ वारकऱ्यांना अन्नातून विषबाधा 

उंचावर अडकलेले, पतंगाच्या मांजात पाय गुंतलेले, जखमी, विजेच्या तारेत, झाडाच्या फांदीत, घराच्या तावदानात अशा स्वरूपात हे पक्षी अडकलेले आढळले होते.

अग्निशमन दलाने वाचविलेले पक्षी-प्राणी
2006 (46), 2007(52), 2008 (54). 2009 (42),
2010 (48). 2011 (63).2012(37). 2013 (48),
2014 (46). 2015 (24). 2016 (42 ),2017 (79).
2018 (45 ) व 2019 (13)

-
सामाजिक भावनेतून पक्षी-प्राण्यांना वाचविण्याचे काम केले जाते. पक्षी किंवा प्राणी अडचणीत आल्याचे दिसून आले की प्राणीमित्र कॉल करतात, आमचे जवान लगेच घटनास्थळी जाऊन अडचणीत सापडलेल्या पक्षी व प्राण्यांची सुटका करतात.
- केदार आवटे,
अधीक्षक, महापालिका अग्निशमन दल

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oh my god! he has rescued 639 birds In 14 years