मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धाचा विहिरीत पडल्याने मृत्यू

मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धाचा परसुतील विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.
old man morning walk died after falling into well belgaum
old man morning walk died after falling into well belgaum sakal

बेळगाव : मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या वृद्धाचा परसुतील विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. मंगळवार (ता. १७) सकाळी ८ च्या दरम्यान होसमनी चाळ दुसरे रेल्वे गेट येथे ही घटना उघडकीस आली असून वासुदेव कृष्णा रायचुरकर (वय ६०) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वासुदेव हे अविवाहित असून नेहमीप्रमाणे ते आज सकाळी सहाच्या दरम्यान वाकिंगला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. मात्र, घरापासून पंधरा फुटावर असलेल्या परसातील विहिरीत अचानक पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

सकाळी सहाच्या दरम्यान घरातून बाहेर पडलेले वासुदेव सकाळी आठ वाजले तरी देखील घरी परतले नसल्याने कुटुंबीय आणि तसेच गल्लीतील लोकांनी त्यांचा शोधा-शोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह परसुतील विहिरीत आढळून आला. त्यामुळे ही माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपनिरीक्षक मनीकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. विहिरीतून बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहावर जिल्हा रुग्णालयातील शवागृहात शल्यचिकित्या करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com