शेतीच्या कारणावरुन सिद्धापुरात वृद्धाचा खून

हुकूम मुलाणी
गुरुवार, 24 मे 2018

मंगळवेढा : सिद्धापूर येथील रतनसिंग गुलाबसिंग रजपूत (वय ६५) (सिद्धापूर)  या वृध्दाचा शेतातील बांध पोखरल्याच्या कारणावरून त्यांच्याच शेतात मारहाण केल्यामुळे मृत्यु झाला. रविंद्र बाबुसिंग रजपूत व राजकुमार महादेव रजपूत (रा. तांडोर) यांच्या विरुध्द जीवे मारल्याची फिर्याद मयतांचा मुलगा हणमंत सिंग रजपूत (वय ३४) याने मंगळवेढा पोलिसात दिली आहे. 

मौजे सिद्धापूर शिवार येथे रतनसिंग रजपूत यांची मालकीची शेतजमींन असून या शेतातील वस्तीवर असताना बुधवारी आठ वाजता शेतातील बांध पोखरल्याच्या कारणावरून त्याना आरोपी रविंद्र बाबुसिंग रजपूत व राजकुमार महादेव रजपूत यांनी वस्तीजवळ बाहेर ओढ़त बाबूसिंग रजपूत यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली नेत त्या झाडाचे आंबे तोडून पिशवीत भरून ते फिर्यादिच्या (मयत) वड़ीला जवळ ठेवत आंबे तोडल्याचा बहाणा करीत लाथा बुक्क्यासह हाताने मारहाण केली आणि रतनसिंग रजपुत यांच्या गुप्तांगावर कमरेवर छातीवर जबर मुक्कामार देवून त्यांचे दोन्ही हात पिरगळुन मारून टाकले. या घटनेचा भारतीय दंडविधास ३०२ (३४) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शाहुराज दळवी करीत आहेत.

Web Title: old man muder for farm in sidhapur