गियरची भानगड आली लक्षात अन् अडाणी बाबा झाले उत्कृष्ठ मेस्त्री

Old Man Repaired The Vehicle After Realizing That There Gear Matter
Old Man Repaired The Vehicle After Realizing That There Gear Matter

कोल्हापूर -  रशियन कंपनीचा ट्रॅक्‍टर होता. तो चालवताना ड्रायव्हरांच्या अनुभवाची ऐशीतैशी झाली. लो-ऍन्ड-हाय गियर एकत्रित असल्याची ती अडचण होती. सेपरेट गियर करण्याचा खर्च एक लाख रुपये असल्याचा कंपनीचा निरोप आला. खिशाला कात्री लावणारा तो आकडा होता. बाबा उर्फ सखाराम गुंडू फराकटे यांचा मेंदू झिनझिनला. कंपनीच्या आकड्याला थेट नकार कळवला गेला. गियरची नेमकी भानगड बाबांच्या लक्षात आली. डोक्‍यात भन्नाट कल्पना सूचली. सोळाशे रुपयांत गियर सेपरेट करण्याचं काम सक्‍सेस झालं. बाबांच ज्ञान चमकलं. बुलडोझर, जीप, ट्रॅक्‍टरच्या दुरुस्तीच्‌ं कसलंही काम असो. बाबांच्या दुरुस्तीचा फॉर्म्युला आजही रामबाण ठरतोय. 

अडाणी बाबांना कसं जमतंय हे काम? 

अंगावर सदरा, हाफ चड्डी, डोक्‍यावर गांधी टोपी हा बाबांचा पेहराव. बोरवडे (ता. कागल) बाबांच गाव. कागदावर अंगठा उमटवणं, एवढंच त्यांच शिक्षण. आई कासूबाई, वडील गुंडू, भाऊ ज्ञानदेव, तुकाराम, गोरख, बळवंत, गणपत व चार बहिणी असा त्यांचा मोठा गोतावळा. त्यांचा नंबर तिसरा. पोटाच्या लढाईपोटी त्यांच अक्षरांशी कधी पटले नाही. ट्रॅक्‍टर ड्रायव्हर, ऊसतोड कामगार, शेतमजूर हे त्यांच श्रमसंस्कारी वर्तुळ. दहा गुंठ्याच्या शेतात अख्खं कुटुंब घाम गाळत होते. दिवसमान बदलल्यावर फराकटे कुटुंबात बुलडोझरचा प्रवेश झाला. बुलडोझरच्या कुरकुरीपुढं बिहारी मेस्त्रीचा उतारा चालायचा. त्याला शोधण्यासाठी फराकटे टीम वैतागायची. बुलडोझर दुरुस्तीचे पैशाचं गणितही मोठे असायचे. बुलडोझर दुरुस्तीवेळी पार्ट उचलताना बिहारी चांदण्या मोजायचा. फराकटे बाबांत मात्र बाहुबली संचारायचा. सहायक मेस्त्रीच पात्र ते रंगवायचे. "बिहाऱ्याला किती पैकं द्यायचं?,' ही तिडीक त्यांच्या डोक्‍यात होतीच. 

मेस्त्रीच्या हाताखाली बाबांचा दुरुस्तीकडे कटाक्ष होता. एकेक पार्ट दुरुस्तीचा धडा डोक्‍यात फिट्ट बसत होता. डोळ्यांत कामाचं तंत्र साठत होतं. अवघड वाटणारं काम समजून घेताना त्यांच्याकडे संकोचाला थारा नव्हता. वाहन बंद पडल्यावर मेस्त्रीचे पात्र ते हुबेहूब रंगवायचे. अभ्यास पक्का झाल्यावर बुलडोझरच्या नादुरुस्त पार्टवर बाबांचा हात भरवशाचा इलाज ठरला. 

बघून शिकलोय जरा जरा. मला कुठं जास्त येतंय.

फराकटे कुटुंबात बुलडोझर्सचा समावेश झाला आहे. त्यांच्या दुखण्याचे औषध बाबांकडेच आहे. दुरुस्तीसाठीचं आवश्‍यक साहित्य त्यांनी आणून ठेवलंय. शेतात रोज सकाळी सहाला ते टच असतात. गियर व लिव्हरच्या टुव्हिलरच त्यांना वावडं आहे. वयाच्या पंचाहत्तरीतही सायकलची साथ त्यांनी सोडलेली नाही. शिक्षणात आडाणी असलेल्या बाबांच मात्र मुलांवर बारीक लक्ष राहील. 'बघून शिकलोय जरा जरा. मला कुठं जास्त येतंय. काम खोळांबल नसलं म्हणजे झालं,' असं ते नम्रपणे सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com