सरसकट लाभामुळे दीड लाख शेतकरी वाढणार 

तात्या लांडगे
बुधवार, 25 जुलै 2018

सोलापूर - कुटुंबाऐवजी आता सरसकट शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याने राज्यातील आणखी एक लाख 57 हजार शेतकऱ्यांची त्यामध्ये वाढ होणार आहे. त्यांच्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये लागणार आहेत. तत्पूर्वी, राज्यातील सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे बाकी असल्याचे राज्याच्या सहकार विभागाकडून सांगण्यात आले. 

वर्षापासून चाललेल्या कर्जमाफीची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नाही. 2001 ते 2016 या कालावधीतील शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी मिळणार आहे; परंतु दीड लाखावरील ज्या-ज्या कुटुंबांनी एकरकमी परतफेड (ओटीएस) योजनेअंतर्गत पैसे भरले आहेत. त्यांना आता पैसे परत करावे, लागणार आहेत, परंतु त्याबाबतचा शासन निर्णय अद्यापही निघालेला नाही. कर्जमाफीच्या ऑनलाइन तांत्रिक घोळामुळे शेतकऱ्यांना बेबाकीचा दाखला मिळत नाही, तर दुसरीकडे जिल्हा बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांची थकबाकी वाढत आहे. त्याचा फटका बॅंकांच्या एनपीए वाढीवर असल्याने बॅंका अडचणीत सापडल्या आहेत. आता नव्या निकषांमुळे कर्जमाफीची व्याप्ती वाढल्याने बॅंकांची चिंता वाढली आहे. 

आकडे बोलतात... 
कर्जमाफीचा पसारा 
ऑनलाइन अर्जदार - 57,69,927 
कर्जमाफी मिळालेले लाभार्थी - 38,95,345 
कर्जमाफी मिळालेली रक्‍कम - 15,923 कोटी 
प्रतीक्षाधीन शेतकरी - 18,74,582 
नव्याने वाढणारे शेतकरी - 1,56,836 

Web Title: One and a half lakh farmers will get debt relief