लाच घेताना लाचलुचपत खात्याककडून एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

थ्री फेज कनेक्‍शनसाठी सर्व्हे करून प्रस्ताव मंजुरीसाठी मेढा येथील उपअभियंता कार्यालयात पाठविण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी आनेवाडी (ता. जावळी) येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. दिपक अरविंद जगताप (वय 26 रा. शाहुनगर, गोडाली) असे कनिष्ठ अभियंत्याचे  नाव आहे. 

सातारा - थ्री फेज कनेक्‍शनसाठी सर्व्हे करून प्रस्ताव मंजुरीसाठी मेढा येथील उपअभियंता कार्यालयात पाठविण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी आनेवाडी (ता. जावळी) येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. दिपक अरविंद जगताप (वय 26 रा. शाहुनगर, गोडाली) असे कनिष्ठ अभियंत्याचे  नाव आहे. 

संबंधीत, तक्रारदराचा आनेवाडी येथे व्यवसाय आहे. त्यासाठी  त्यांना थ्री फेज विज कनेक्‍शनची आवश्‍यकता होती. ते मिळण्यासाठी त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आनेवाडी कार्यालयात अर्ज केला होता. त्यानुसार जागेचा सर्व्हे करून प्रस्ताव मेढा (ता. जावळी) येथील उपअभियंता कार्यालयात पाठविण्यासाठी जगताप याने तक्रारदाराकडे आठ हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार केली.

त्यानुसार, आज सापळा रचून पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये आठ हजार रुपयांची लाच स्विकारताना जगतापला आनेवाडी येथील त्याच्या कार्यालयात रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया भुईंज पोलिस ठाण्यात सुरू आहे. उपअधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आरीफा मुल्ला, सहायक फौजदार जयंत कुलकर्णी, आनंदराव सपकाळ, हवालदार संभाजी बनसोडे, भरत शिंदे, विजय काटवटे, तेजपाल शिंदे, संजय साळुंखे, संजय अडसूळ, विनोद राजे, अजित कर्णे, प्रशांत ताटे, विशाल खरात, मधुमती कुंभार, निलीमा जमदाडे, श्रद्धा माने यांनी ही कारवाई केली. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन श्री. नाडगौडा यांनी केले आहे.

Web Title: one arrested in bribe case