बेकायदेशीर सावकारीच्या गुन्ह्यात एकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. 

नगर : बेकायदेशीर सावकारी करीत असल्याच्या आरोपावरून वसंतराव गंगाधर झावरे (रा. रेणावीकर चेंबर्स, इवळे गल्ली, माळीवाडा, नगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. 

शिवराम अप्पाजी जासूद (रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर) यांनी वसंत गंगाधर झावरे बेकायदेशीर सावकारकी करीत असल्याबाबत 20 सप्टेंबर 2017 ला उपनिबंधक नगर तालुका कार्यालयात तक्रार केली होती. उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकाऱ्यांच्या पथकाने झावरे यांच्या माळीवाड्यातील घरी छापा घातला. त्या वेळी त्याच्याकडे बेकायदेशीर सावकारीचे कागदपत्रे आढळून आली. सहकार अधिकारी अल्ताफ अब्दुल शेख यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात जून 2018 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयाच्या आवारात येणार असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक संदीप घोडके, रवींद्र कर्डिले, अशोक गुंजाळ, विजय ठोंबरे यांच्या पथकाने सापळा लावून त्यास पकडले. तपासासाठी त्याला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Web Title: One arrested in illegal Borrowing criminal case