पाचगणीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

एक नजर

  • पाचगणी (जि. सातारा) येथील मुलीचे अपहरण करणाऱ्या एकास अटक.
  • सुभाष सोनबा जाधव (वय २७, केर्ले, ता. शाहूवाडी, कोल्हापूर) असे त्याचे नाव
  • अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून कारवाई. 

सांगली - पाचगणी (जि. सातारा) येथील मुलीचे अपहरण करणाऱ्या एकास अटक करण्यात आली. सुभाष सोनबा जाधव (वय २७, केर्ले, ता. शाहूवाडी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली. 

अधिक माहिती अशी, की जिल्ह्यातील अपहरणाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अपर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी दिले आहेत. त्यानुसार कक्षाच्या सहायक निरीक्षक विद्या  जाधव यांच्या नेतृत्वाखाली खास पथक तयार करण्यात आले आहे.

पाचगणी परिसरातून मुलीचे अपहरण  केल्याची फिर्याद नोव्हेंबर २०१७ मध्ये  पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. मार्च २०१९ मध्ये हा तपास कक्षाकडे देण्यात आला. गुन्ह्यातील संशयित सुभाष जाधव याचे मोबाइल लोकेशनद्वारे शोध घेतले. तो कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ले येथे असल्याचे समोर आले. त्यानुसार सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता, अपहरण केल्याचे समोर आहे. अपहरीत मुलीसह ताब्यात घेण्यात आले. 

दरम्यान, गेल्या वर्षभरात अपहरणाचे २० गुन्हे  उघडकीस 
आणले आहे. या तीन महिन्यांत सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. आणखी काही गुन्हे लवकरच उघडकीस येतील. 

Web Title: One arrested for kidnapping a girl in Panchgani