प्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात 

हुकूम मुलाणी
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

मंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून या प्रकरणांमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे. या दृष्टीने उलघडा होणे आवश्यक आहे. 

माचणूर येथून 26 ऑक्टोबर रोजी प्रतीकचे अपहरण करून निर्घुन हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणामुळे नदीकाठच्या सधन भागात खळबळ उडाली. सिध्देश्वर नगरी माचणूर घडलेल्या हत्या प्रकरणाने बदनाम झाली.

मारेकऱ्यांनी पोलिसांचा संशय आपल्यावर येऊ नये आणि तपासाची दिशा बदलली जावी यासाठी मृतदेहाजवळ ठेवलेल्या साहित्यावरून नरबळी केल्याचे दाखवले गेले. पण पोलिस अधिक्षकांनी नरबळीने हत्येचा त्यावेळीच विरोध केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्यामुळे त्यांच्या विरोधात जनहीत शेतकरी संघटनेसह विविध राजकीय पक्ष संघटनांनी वेगळ्या मार्गाने आंदोलन केले. प्रतिक नरबळी नाही तर हत्याच असल्याचा दावा सुरूवातीलाच पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी केला होता. 

तपासासाठी पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनानुसार उपविभागिय अधिकारी दिलीप जगदाळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, पोलीस निरीक्षक गिरी गोसावी, अरूण सावंत यांच्यासह महिला पोलिस अधिकारी प्रिती जाधव, मिना जरे यांची तपास पथके तयार केली. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी दिवाळीचा सण घरी न साजरा करता शोधण्यात अहोरात्र परिश्रम घेतले. अतिशय शांत डोक्याने पोलिसांनी अन्य कोणाला त्रास न देता निष्पाप व्यक्तीवर अन्याय होणार नाहीं याची खबरदारी घेत नेमके मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जादा दिवस घेत शेवटी संशयितापर्यंत पोचले. मारेकऱ्याचा शोध लागत नसल्यामुळे विविध राजकीय पक्ष, संघटनानी उभा केलेले आंदोलन, रास्ता रोको, घंटानाद, यामुळे पोलिसाच्या कामगिरीवर संशय व्यक्त होत असताना जनतेच्या भावना आणि वरिष्ठाकडून विचारणा यात पोलिसांनी मात्र शांत पध्दतीने हे प्रकरण हाताळले. 

सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले भारिप नेते अॅड प्रकाश आंबेडकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भारत भालके, प्रणिती शिंदे, प्रशांत परिचारक, यांच्यासह जनहीत शेतकरी संघटनेने हे हत्या प्रकरण धसास लावून धरले. नेत्याचे दौरे, आंदोलन, आणि तपास यामुळे पोलिस अधिकाऱ्यांना मारेकरी सापडत नसल्यामुळे तणावाखाली होते. दरम्यान जनहीत शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरूच आहे.

Web Title: one arrested in pratik shivsharan murder case