कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात पोत्यात बांधलेले महिलेचे प्रेत

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

मोहोळ - महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात टाकून दिलेले, पोत्यात बांधलेल्या अवस्थेतील प्रेत अर्जुन सोंड शिवारात वाहुन आल्याने खळबळ उडाली आहे.

मोहोळ - महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात टाकून दिलेले, पोत्यात बांधलेल्या अवस्थेतील प्रेत अर्जुन सोंड शिवारात वाहुन आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ५ वाजणेच्या सुमारास अर्जुनसोंड शिवारात जमीन गट नं ९३मधील सौंदणे कट ते सावळेश्वरकडे जाणाऱ्या उजनी डावा कालव्यामध्ये नागनाथ कांबळे यांचे इलेक्ट्रीक मोटारच्या पाईपला एक पोते अडकले आढळून आले. यावेळी कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले पाटबंधारे कर्मचारी दशरथ बनसोडे हे  कॅनॉलची पहाणी करत जात असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी याबाबत पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी ते पोते बाहेर काढून त्याची पहाणी केली असता त्यात ४०ते ४५ वयाच्या एका अज्ञात महिलेचे प्रेत आढळून आले. 

त्या महिलेच्या अंगावर भगव्या रंगाची साडी, केस काळे लांब, कानात रिंग फुले, हातावर खरचटलेले, गळ्यावर खोलवर जखम असलेली, पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. अज्ञात इसमाने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा प्रकार झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबत अज्ञात इसमाविरुध्द अज्ञात कारणाने हा प्रकार केल्याचा गुन्हा मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास सपोनी विकांत बोधे हे करीत आहेत.

Web Title: one body discovered in running water of the canal

टॅग्स