शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यु

राजेंद्र होळकर 
गुरुवार, 17 मे 2018

विहिरीमध्ये पोहत असताना अचानक चक्कर आल्याने एक शाळकरी विद्यार्थी पाण्यात बुडून मृत्यू झाला. राहुल संजय मिरगे (वय १३, मुळ रा.माणकापूर, ता.चिक्कोडी, सध्या रा. दुर्गा माता मंदीराशेजारी, जुना चंदूर रोड, इचलकरंजी) असे त्या मुलाचे नाव आहे. तो आपल्या आईवडिलांसाठी एकटाच होता.

इचलकरंजी - विहिरीमध्ये पोहत असताना अचानक चक्कर आल्याने एक शाळकरी विद्यार्थी पाण्यात बुडून मृत्यू झाला. राहुल संजय मिरगे (वय १३, मुळ रा.माणकापूर, ता.चिक्कोडी, सध्या रा. दुर्गा माता मंदीराशेजारी, जुना चंदूर रोड, इचलकरंजी) असे त्या मुलाचे नाव आहे. तो आपल्या आईवडिलांसाठी एकटाच होता.

ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृत राहुल मिरगे याच्या वडीलांचा दोन वर्षापूर्वी मृत्यु झाला होता. त्यामुळे त्याची आई त्याला घेवून काही महिन्यापासून इचलकरंजी येथील जुना चंदूर रोडवरील दुर्गा माता मंदीराशेजारी राहण्यास आली होती. आज दुपारी राहुल पोहण्यासाठी म्हणून घराशेजारील शेतवडी मधील विहिरीमध्ये गेला असता त्याला चक्कर आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. यांची नोंद शिवाजीनगर पोलिस स्थानकात झाली आहे. 

Web Title: one boy killed in ichalkaranji