मंगळवेढा : ट्रकची मोटारसायकलला धडक; एकाचा मृत्यू

accident
accident

आंधळगाव : तालुक्यातील आंधळगाव येथे मोटारसायकल वरून जात असलेल्या तिघांना ट्रक चालकाने जोराची धडक दिल्याने समीर बंडुलाल शेख (वय १८, रा.आंधळगाव ) याचा मृत्यू झाला. यात बाळासो भीमराव बनसोडे व साजन बबन शेख हे जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री 9 च्या सुमारास बनसोडे वस्ती येथे घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की मोटारसायकल क्र. (एम.एच.१२ एफवाय ६९५३) यास ट्रक क्र. (एमएच १० झेड ११४०) या चालकाने दारूच्या नशेत जोराची धडक दिल्याने यामध्ये समीर शेख याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असुन यामध्ये बाळासो बनसोडे याच्या उजव्या हाताला व तोंडाला गंभीर मार लागला आहे. तर साजन शेख यास मुक्का मार लागून मोटारसायकलचे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

ट्रकचालक दादासो संभाजी कदम (रा. लांडगेवाडी ता. कवठे महांकाळ जि. सांगली) यास पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहूराजे दळवी करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com