ट्रॅक्टर-दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

बेळगव - ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. किरणसिंग रजपुत (वय, 45 रा. जाधव नगर, बेळगांव) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. बेळगाव खानापूर महामार्गावरील गोगटे सर्कल जवळ हा अपघातात झाला. 

हे पण वाचा - विषय हार्ड तर ; उडव की मग हवेत बार... 

याबाबत अधिक माहिती अशी, किरणसिंग हे आपल्या दुचाकीवरून कामावर जात असताना गोगटे सर्कल जवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे रक्तस्त्राव झाला आणि किरणसिंग यांचा जागीच मृत्यू झाला. 

हे पण वाचा - कर्नाटक सरकरमध्ये नाराजीनाट्य 

या घटनेचा बेळगाव दक्षिण रहदारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधिक तपास करत आहेत.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead in accident at belgaum