यमगेजवळ अपघातात एक ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुरगूड : मुरगूड - निपाणी मार्गावर यमगे गावाच्या हद्दीतील कुंभार गेटजवळ अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात रात्री साडेआठच्या सुमारास झाला. उमेश बच्चाराम माने (वय 45, रा. कोडणी ता. चिक्कोडी) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.

अधिक माहिती अशी, की कोडणी (ता. चिक्कोडी) येथील उमेश बच्चाराम माने दुपारी राधानगरी येथील नातेवाइकांकडे मोटारसायकल (केए 23 ईएल 2549) वरून गेले होते. कोडणीकडे परत येत असताना मुरगूड - निपाणी मार्गावर आज रात्री साडेआठच्या सुमारास यमगे गावच्या हद्दीतील कुंभार गेटजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. शेजारीच वस्ती असल्यामुळे अपघाताचा आवाज ऐकून नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. काहींनी त्यांच्या खिशामध्ये असलेल्या कागदपत्रावरून त्यांच्या गावाकडील नातेवाइकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली, तसेच पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.

Web Title: one dead in accident near yamage

टॅग्स