कऱ्हाड : मॉर्निंग वाॅकला गेलेल्या एकास कंटेनरने चिरडले

सचिन शिंदे
रविवार, 8 एप्रिल 2018

सुनील आनंदा माने (वय ५२, रा. गुरूवार पेठ, भाजी मंडई) असे मृताचे नाव आहे. दशरथ सुर्यवंशी (रा. बुधवार पेठ) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दोघेही रोज मार्निंग वाॅकला जात होते. आजही ते गेले  होते. त्यावेळी येथील दत्त चौकात विट्याकडे जाणाऱ्या कंटेनरने त्या दोघांनाही चिरडले.

कऱ्हाड : मॉर्निंग वाॅकला गेलेल्या एकास कंटेनरने चिरडले. त्यात संबधिताचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक गंभीर जखमी आहे. येथील दत्त चौकात आज सकाळी सातच्या सुमारास अपघात झाला.

सुनील आनंदा माने (वय ५२, रा. गुरूवार पेठ, भाजी मंडई) असे मृताचे नाव आहे. दशरथ सुर्यवंशी (रा. बुधवार पेठ) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दोघेही रोज मार्निंग वाॅकला जात होते. आजही ते गेले  होते. त्यावेळी येथील दत्त चौकात विट्याकडे जाणाऱ्या कंटेनरने त्या दोघांनाही चिरडले. त्यात माने यांच्या पोट व डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दशरथ यांच्या पायावरून कंटेनर गेल्याने ते त्यात गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती शहर पोलिसात समजताच वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाला..जखमीला तोपर्यंत नागरिकांनी सह्याद्रीमध्ये उपचारास दाखल केले होते. पोलिस अपघातस्थळी पोचल्यानंतर त्यांची ओळख पटली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी कुटीर रूग्णालयात आणण्यात आला होता. तेथे माने यांचे आप्तेष्ट जमले होते.

Web Title: one dead in accident neat Karhad