नगर जिल्ह्यात संघर्षात एक ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पाथर्डी - कळस पिंप्री येथे शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या वादातून गावकरी व अतिक्रमणधारक कुटुंबामध्ये मारामारी होऊन दोन्ही बाजूंचे बारा जण जखमी झाले. काल दुपारी झालेल्या या घटनेतील जखमी कंस लक्ष्मण पवार (वय ६५) यांचा उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. याबाबत नगर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

कळस पिंप्री येथील गायरान जमिनीत काही जणांनी अतिक्रमण केले आहे. कृषी विभागाचे जलयुक्त शिवार योजनेचे खोल समतल चराचे काम अतिक्रमणधारक कुटुंबाने अडविल्याचे सांगत सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी २५ ऑगस्ट रोजी पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांची भेट घेतली. हा जमिनीचा विषय असल्याने तहसीलदारांना भेटण्याचा सल्ला रत्नपारखी यांनी दिला. त्यानुसार ग्रामस्थांनी सोमवारी तहसीलदार नामदेव पाटील यांची भेट घेतली. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांचे पत्र आणण्यास सांगितले. ग्रामस्थांनी काल गटविकास अधिकाऱ्यांचे पत्र आणून ते रत्नपारखी यांना दिले आणि ‘जलयुक्त शिवार’च्या कामासाठी पोलिस संरक्षण देण्याची विनंती केली. त्यांनी ‘तुम्ही पुढे जा, पोलिस येतील’ असे सांगितल्याने ग्रामस्थ गावात काम सुरू असलेल्या ठिकाणी गेले. त्या वेळी अतिक्रमणधारक कुटुंबाने सरपंच, माजी सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांवर हल्ला केला. या वेळी दोन्ही गटांत मारामारी झाल्याने  ग्रामस्थ सैरभैर पळाले.

Web Title: one dead in nagar