वादळी वार्‍यामुळे घराचे छप्पर पडून एकाचा मृत्यू

जालिंदर सत्रे
बुधवार, 18 एप्रिल 2018

पाटण (जि. सातारा) : पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यात मणदूरे येथे अंगावर घराचे छप्पर पडून दिपक पांडुरंग जाधव (वय- ५०) हे जागीच मृत्यु झाला. पाटण व अडुळ येथील दोन घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या असुन झाडांच्या फांद्या पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला.नवारस्ता परिसरात गारांचा पाऊस पडला. 

पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सकाळपासुन हवेतील उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला होता. दुपारनंतर त्यात अधिकच भर पडुन वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली.

दरम्यान कोयना धरण परिसरात तब्बल पाऊण तास धरण पाऊस पडला. पाटण रामापूर येथे आनंदा किसन चौधरी यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. मणदूरे येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. त्यामुळे दिपक जाधव हे घराकडे गेले. त्यांचे कुटुंबीय पाठीमागुन येत होती. घराचे दार उघडुन घरात गेल्यावर वाऱ्याचा झोत घरात घुसल्यामुळे घराचे छप्पर जाधव यांच्या अंगावर पडले.

त्यादरम्यान लोकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी श्री. जाधव यांना घरातु बाहेर काढले त्यावेळी ते बेशुध्द अवस्थेत होते. उपचारासाठी पाटणच्या पाटण ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. त्यावेळी डाॅक्टरांना त्यापुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचे शव विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने त्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: One dead in Satara district due to hailstorm