...आणि होत्याचे नव्हते झाले

संतोष चव्हाण
गुरुवार, 14 जून 2018

उंब्रज - सुट्टीवर आलेल्या लष्कारातील जवानाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. चरेगाव येथे आज सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. अमोल कृष्णत माने (वय २९) असे संबधिताचे नाव आहे. अमोल राहत्या घरी नळाची मोटर जोडत होता. त्यावेळी त्याला शॉक लागला. अमोल दहा वर्षापासून सैन्य दलात आहेत. त्यांच्या अकस्मीत निधनाने चरेगाववर शोककळा पसरली आहे. 

पोलिस व घटनास्थलावरील माहितीनुसार, अमोल जम्मू काश्मीर येथील श्रीनगरमध्ये १३ ऐन्डी रेजीमेंनट राष्ट्रीय रायफलमध्ये कार्यरत होता. २२ मे पासून महिनाभराच्या सुट्टीवर गावी चरगेवाल येथे आला असताना ही घटना घडली. 

शॉक लागला असताना त्यातून त्यांनी निसटण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न सफल झाला नाही. अमोल जोरात ओरडल्याने शेजारच्या लोक आले. त्यांनी तत्काळ मेनस्वीच बंद केला. मात्र तोपर्यंत अमोलचा मृत्यू झाला होता. अमोलला त्याच अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

अमोल पदवीधर असून, यांच्या मागे आई, वडील, पत्नी, लहान बहिण असा परिवार आहे. त्यांच्या घरातील तो कर्ता होते. त्यामुळे या घटनेने माने कुटूंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. आर्थिक परिस्थितीवर मार्ग काढताना जवान अमोल नेहमीच धैर्याने सामोरा गेला. अतिशय मनमिळावू, होतकरू व सर्वांशी आपुलकीने वागणारा अमोल अशी त्याची ओळख होती. 

या घटनेनंतर अमोलची पत्नी निशब्द झाली असुन, आईचा हंबरडा ऱ्हद्य पिळवटून टाकणारा होता. तर त्यांच्या वडीलांचे अश्रु पाहुन गावकर्यांनाही गहीवरुन आले. जवान अमोल यांच्या आकस्मित निधनाचे वृत्त कळताच एनसीसीचे कऱ्हाड येथील अधिकारी, त्यांचे लुधियाना येथील सहकारी जवानांनी चरेगावला धाव घेवून कुंटूबीयांना दिलासा देत होते. सायंकाळी उशीरा जवान माने यांच्यावर अमोल माने अमर रहे अशा घोषणा देत अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत उंब्रज पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

क्षणार्धात खेळ संपला...
अमोलचा चार वर्षापुर्वी विवाह झाला होता. नऊ जुन रोजी त्याचा वाढदिवसही झाला होता. त्यांच्या पत्नीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आज (गुरुवारी) होता. कार्यक्रमाची घरात आनंदाने तयारी चालली असतानाच नियतीने डाव साधल्याने त्यांच्या निधानाबद्दल हळहळ व्यक्त होत होती. शॉक लागल्यानंतर क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे गावावर दुख दाटल्याची भावना झाली होती.

Web Title: one jawan Death due to the electricity shock