बार्शी येथे एकाचे अपहरण आणि सुटका, दोघांना अटक

सुदर्शन हांडे
मंगळवार, 10 जुलै 2018

बार्शी - अवैध गर्भलिंग तपासणी करून तू भरपूर पैसे कामावलेत आम्हाला दहा लाख रुपये दे अन्यथा तुला मारून टाकू, तुझ्याकडे सोनोग्राफी मशीन आहे तू गर्भलिंग निदान करत होता ही माहिती देऊन तुझ्यावर गुन्हा दाखल करू अशी धमकी देत बार्शी येथील नेचर क्युअर डॉक्टर नंदकुमार रामलिंग स्वामी (वय-४८) याचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी डॉक्टर स्वामी यांच्या फिर्यादी वरून ज्ञानेश्वर उर्फ बप्पा लावंड, उमेश मस्तुद दोघे रा.बार्शी, वणवे मॅडम, अनिल शिंदे व सोमा या पाच जणांवर गुन्हा अपहरणाचा दाखल करण्यात आला आहे. बार्शीतील लावंड व मस्तुद यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच स्वामी यांचा सुटका करण्यात आली आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (ता.९) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास डॉ.स्वामी हे स्वतःच्या मोटारसायकलहुन मंगळवार पेठ येथून बार्शी बाजारपेठेकडे येत होते. याच वेळी पांढऱ्या रंगाचे इंडिका गाडीतून (क्रमांक : एम.एच.४५/८२१५) आलेल्या अपहरणकर्त्यांनी गाडी आडवी लावून मारहाण करत त्यांना गाडीमध्ये बसून घेऊन गेले. याच वेळी मंगळवार पेठ येथील लोकांनी डॉक्टरचा आरडा-ओरडा पाहून कोणाचेतरी अपहरण झाले असल्याचे पोलिसांना कळवले. डॉ.स्वामी याना गाडीत घातल्यानंतर आत वणवे व इतर अनोळखी इसम होता. तर बाप्पा लावंड गाडी चालवत होता. गाडीतून परांडा रस्त्याने इन्द्रेश्वर शुगर परिसरात नेले. या नंतर बार्शी बायपास रोड वरील परांडा चौकात दुसरी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी (क्रमांक : एम.एच.४२ वाय.१०११) आली. यातील अनिल शिंदे व सोमा नावाच्या व्यक्तींनी आमि वणवे बाईने, बाप्पा लावंड यांनी स्वामीला तू पैसे दे अन्यथा तुझ्याकडे सोनोग्राफी मशीन आहे तुझ्याकडे गर्भलिंगतापसणीसाठी महिला आली होती अशी माहिती देऊन तुझ्यावर गुन्हा दाखल करू अशी धमकी देऊ लागले. तसेच मारहाण करू लागले. यावेळी आरडा-ओरडा करल्याने परांडा चौक परिसरात लोक जमा झाल्याने तेथेच सोडून, गाड्या घेऊन पळून गेले.

हा सर्व प्रकार सुरू असतानाच मंगळवार पेठ येथील नागरिकांच्या माहितीवरून अपहरण झाल्याच्या घटनेचा तपस पोलीस करत होते. त्यांनी स्वामी यांची सुटका केली.

स्वामी याच्या तक्रारी वरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
त्यानंतर पोलिसांनी काही लोकांना अटक केली आहे. तसेच या घटनेत वापरण्यात आलेली दोन्ही वाहने पोलिसानी जप्त केली आहेत.

Web Title: One kidnapped and rescued at Barshi, both were arrested

टॅग्स